मालेगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी केंद्रावर शुक्रवारी कांद्याला शंभर रुपये क्विंटल बाजारभाव मिळाल्याने संतप्त शेतकºयांनी मुंबई-आग्रा महामार्गावर कांदा फेकून शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करीत घोषणाबाजी केली. तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती आहे. तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकºयांनी कांदा साठवून ठेवला आहे. साठवून ठेवलेल्या कांद्याला बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे. शुक्रवारी मुंगसे कांदा खरेदी केंद्रावर कमीत कमी शंभर रुपये तर जास्तीत जास्त ७५१ प्रति क्विंटल बाजारभाव होता. सरासरी ५२५ रुपये प्रति क्विंटल दराने कांद्याची विक्री झाली. दिवसभरात १० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ७८८ वाहनातील कांद्याचा लिलाव झाला. सायंकाळी कांदा कवडीमोल भावाने खरेदी केला जात असल्याने संतप्त शेतकºयांनी मुंबई- आग्रा महामार्गावर कांदा फेकत निदर्शने दिली. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला. या आंदोलनात टेहरेचे माजी सरपंच प्रभाकर शेवाळे, दीपक शेवाळे, सागर शेवाळे, प्रशांत शेवाळे आदिंसह कांदा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.
संतप्त शेतकऱ्यांनी महामार्गावर फेकला कांदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 1:47 AM