शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘स्मार्ट’वर भुजबळ नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 11:38 PM

महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्मार्ट सिटी योजनेत केवळ सुशोभिकरण न करता लोकांच्या गरजा आणि सुरक्षितता ओळखून खर्च करणे अपेक्षित आहे. स्मार्ट सिटीच्या कामांबाबत अनेक तक्रारी आहेत. शेतकऱ्यांचेदेखील प्रश्न असताना कामे पुढे रेटली जाता कामा नये, तर लोकांच्या गरजा ओळखून कामांचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मनपा आयुक्तांना केल्या.

ठळक मुद्देकंपनीचा कारभार। लोकांच्या गरजा ओळखून कामे करण्याच्या आयुक्तांना सूचना

नाशिक : शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्मार्ट सिटी योजनेत केवळ सुशोभिकरण न करता लोकांच्या गरजा आणि सुरक्षितता ओळखून खर्च करणे अपेक्षित आहे. स्मार्ट सिटीच्या कामांबाबत अनेक तक्रारी आहेत. शेतकऱ्यांचेदेखील प्रश्न असताना कामे पुढे रेटली जाता कामा नये, तर लोकांच्या गरजा ओळखून कामांचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मनपा आयुक्तांना केल्या.पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन आराखडा बैठकीत मनपा आयुक्तांनी महापालिकेचा आराखडा सादर करताना स्मार्ट सिटीच्या कामाकडे लक्ष वेधले. स्मार्ट सिटीच्या कामासंदर्भातील अनेक तक्रारी आहेत. एक किलोमीटरचा रस्ता तयार करण्यासाठी दोन वर्षे लागल्याचा मुद्दा आमदार माणिकराव कोकाटे यांनी उपस्थित करून शहरातील वाहतुकीच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. यावेळी आयुक्त गमे यांनी राष्टÑीय महामार्गाचा हा विषय असल्याचे सांगताच पालकमंत्र्यांनी वाहतूक कोंडी कमी करण्यासंदर्भात काय करता येईल याला प्राधान्य देण्याच्या सूचना केली. स्मार्ट सिटी ग्रीनफिल्ड येथील शेतकऱ्यांचे प्रश्न अद्याप निकाली निघालेले नाहीत. त्यांच्या गरजा ओळखल्या पाहिजेत. या कामातील पहिल्या टप्प्यात पूररेषेत होणाºया कामांच्या फेर नियोजनाबाबतही भुजबळ यांनी सूचना करताना लोकांच्या हितासाठी कामे व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. स्मार्ट सिटीत नागरिक असुरिक्षत असता काम नये. सुरक्षा देण्याचे काम पोलिसांचे आहे. स्मार्ट सिटीच्या बजेटमध्ये सीसीटीव्हीसाठी तरतूद केली जावी. सीसीटीव्हीमुळे शहरातील परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना मदत होईल, असेदेखील पालकमंत्र्यांनी सुचविले.द्वारका चौकाच्या वाहतूक कोंडीचा मुद्दास्मार्ट शहराचा विषय मांडला जात असताना आमदार माणिकराव कोकाटे आणि आमदार राहुल अहेर यांनी द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्याची तरतूद करण्याची मागणी केली. रस्ते रुंदीकरणाची गरज लक्षात घेऊन स्मार्ट सिटीचे काम हाती घेणे अपेक्षित होते, असे कोकाटे यावेळी म्हणाले. शहरातील द्वारका आणि इंदिरानगर बोगदा येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला नाही, तर द्वारका चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा कोकाटे यांनी दिला.पालकमंत्र्यांची सूचनाद्वारका येथील वाहतूक कोंडीचा मुद्दा बैठकीत उपस्थित झाल्यानंतर भुजबळ यांनी मुंबईतील हाजीअलीचे उदाहरण दिले. वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असताना तेथील वाहतूक बेट तोडून तेथे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. तसा काही प्रयत्न करता येईल का याचा अभ्यास करण्याच्या सूचना त्यांनी महापालिकेला दिल्या.कॅमेºयांचे नियोजन करावे-पोलीस आयुक्तशहराच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून ५२६ कॅमेरे लावण्यात आले आहे. आणखी ४,५०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची गरज असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी यावेळी सांगितले. शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी अनधिकृत रिक्षा आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण महत्त्वाचे आहे. त्यासाठीचे नियोजन करण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी