शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

संतप्त ग्रामस्थांनी काढला मोर्चा

By admin | Published: May 08, 2017 12:43 AM

सप्तशृंगगड : श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील ट्रस्टच्या व्यवस्थापकाच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या ग्रामस्थांनी संतप्त होऊन ट्रस्टच्या कार्यालयावर मोर्चा काढला.

 लोकमत न्यूज नेटवर्कसप्तशृंगगड : श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या व्यवस्थापकाच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या ग्रामस्थांनी संतप्त होऊन व्यवस्थापकाची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी ट्रस्टच्या कार्यालयावर मोर्चा काढला.येथील कर्मचाऱ्यांमार्फत आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी माकपातर्फे ट्रस्टवर मोर्चा काढणे, कर्मचाऱ्यांना त्रास देणे यासाठी ट्रस्ट गाजत आहे तसेच भाविकांकडूनही आरोप प्रत्यारोप होत असतानाच आज सप्तशृंगगडावरील सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. यावेळी ट्रस्टच्या विश्वस्तांना ग्रामस्थांनी घेराव घालून आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्या अशा कडक शब्दात जाब विचारला. सप्तशृंगगडावरील सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या कारभाराबाबत न्यासाचे कर्मचारी व ग्रामस्थांनी वेगवेगळ्या कारणांनी नाराजी व्यक्त करीत आहे. ट्रस्ट ग्रामस्थांना विश्वासात न घेता कामे करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी कोपरगाव येथील नगरसेवक राजेंद्र पाठक यांनी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे हे मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप केला होता. याबाबत पाठक यांनी वृत्तपत्रात दहातोंडेंविषयी वृत्त प्रसिद्ध केले होते.प्रसिध्द झालेले वृत्त दहातोंडे यांनी सोशल मीडियावर टाकल. ेयात पाठक यांच्या विरुद्ध त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच शिरपूर (धुळे) येथील भाविक चौधरी नामक व्यक्तीमार्फत व्यवस्थापकांनी गावाची बदनामी होईल असे वृत्त प्रसिद्ध केले. असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ,ज्येष्ठ नागरिकांसह,महिला व पुरूषांनी ट्रस्टच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी येथे उपस्थित असलेले ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे व राजेंद्र सूर्यवंशी यांना सर्व त्रस्त ग्रामस्थांनी जाब विचारला. आणि उन्मत्त झालेल्या व्यवस्थापकाची हकालपट्टी करण्यात यावी तसेच ट्रस्ट बरोबर गावाचीदेखील बदनामी होत असल्याचे आरोप सांगितले. विश्वस्तच व्यवस्थापकाला पाठीशी घालत असल्याचाही आरोप काही ग्रामस्थांनी केला. शिरपूर येथील ज्या व्यक्तीने गावाची बदनामी होईल असे वृत्त प्रसिद्ध केले त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन पोलिसांना देण्यात आले. यावेळी राजेश गवळी, गणेश बर्डे, उपसरपंच गिरीश गवळी, राधेश्याम दुबे, बाबूराव गवळी, विजय दुबे, संदीप बेनके, अजय दुबे, रामप्रसाद बत्तासे, योगेश कदम, राजेंद्र वाघ, ईश्वर कदम, विनायक दुबे, रमेश पवार, अर्जुन सूर्यवंशी, रमेश गवळी, ग्रामस्थ निर्मल डांगे, दीपक जोरवरकर, सागर बत्तासे, रामप्रसाद बत्तासे,साई बेनके, नवनाथ बेनके, अनिल सताळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.