शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

संतप्त गावकऱ्यांनी समृद्धीचे काम थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 10:44 PM

सिन्नर : मुंबई-नागपुर समृद्धी महामार्गामुळे वावी-कहांडळवाडी हा संगमनेर तालुक्यातील तळेगावपर्यंत जाणारा रहदारीचा मुख्य रस्ता बंद होणार आहे. त्यामुळे संतप्त ...

ठळक मुद्देअंडरपासची मागणी : चर्चेनंतर आंदोलन मागे

सिन्नर : मुंबई-नागपुर समृद्धी महामार्गामुळे वावी-कहांडळवाडी हा संगमनेर तालुक्यातील तळेगावपर्यंत जाणारा रहदारीचा मुख्य रस्ता बंद होणार आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कहांडळवाडी येथील ग्रामस्थांनी समृद्धी महामार्गाचे काम थांबविले. वावी-कहांडळवाडी रस्त्यावर अंडरपासची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.समृद्धीच्या सर्वेक्षणदरम्यान येथील अंडरपास वगळला जाऊन वावी-पारेगाव, वावी-देवकौठे या तुलनेने वर्दळ नसलेल्या, मात्र जिल्हा मार्ग म्हणून रेखित झालेल्या रस्त्यांवर अंडरपास देण्यात आले आहेत. हे दोन्ही अंडरपास वावी-कहांडळवाडी मार्गावरून होणाºया वाहतुकीला गैरसोयीचे आहेत. मोठा वळसा घालून सर्व्हिसरोडने ही वाहतूक होणार असल्याने कहांडळवाडी ग्रामस्थांनी आज थेट समृद्धीच्या साइटवर जाऊन सदर रस्त्यावर भर टाकण्याचे सुरू असलेले काम बंद पाडले. यावेळी रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता देसाई यांच्याशी संपर्क साधत ग्रामस्थांनी आपल्या भावना कळविल्या. समृद्धीच्या सर्वेक्षणावेळी रस्त्याचा दर्जा तांत्रिकदृष्ट्या रेकॉर्डवर न आल्याने येथील अंडरपास वगळला गेला असल्याची माहिती देसाई यांनी दिली. मात्र, लॉकडाउनचा कालावधी संपुष्टात आल्यावर यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठविण्यात येईल. ग्रामस्थांच्या मागणीची योग्य ती दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देसाई यांनी दिले. सरपंच अण्णासाहेब कहांडळ, उपसरपंच पुंजाहरी कहांडळ, सदस्य श्याम कहांडळ, कांचन कोकणे, लक्ष्मीबाई अभंग, माया नाठे, कल्पना खरात यांच्यासह ग्रामस्थ याठिकाणी उपस्थित होते.सोशल डिस्टन्स्ािंगचा अवलंब करत परस्परांपासून सुरक्षित अंतर ठेवत ग्रामस्थांनी महामार्गाचे काम बंद करण्याची मागणी केली. वावी ठाण्यातील हवालदार नितीन जगताप, दशरथ मोरे यांनी ग्रामस्थांची समजूत काढत जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदीचा अध्यादेश लागू असल्याने आंदोलन न करण्यास सांगितले. वरिष्ठ अधिकारी व ठेकेदाराचे सकारात्मक बोलणे झाल्यानंतर ग्रामस्थ या ठिकाणाहून निघून गेले.वावी-कहांडळवाडी हा रस्ता नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा आहे. या मार्गावरून फेºयादेखील सुरू आहेत. असे असताना सर्वेक्षणावेळी या रस्त्याचे महत्त्व दुर्लक्षित करण्यात आले. लॉकडाउनचा कालावधी आटोपताच आपण स्वत: रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेणार आहोत. या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत अंडरपास होईलच, असे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग