नाशिक : फेब्रुवारीच्या १ व २ तारखेला जळगावमध्ये होणाऱ्या उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाध्यक्षपदी पक्षी अभ्यासक मॉडर्न हायस्कूलचे पर्यवेक्षक अनिल माळी यांची पुढील दोन वर्षांकरिता निवड करण्यात आली. माळी हे मावळते अध्यक्ष डॉ. सुधाकर कु-हाडे यांच्याकडून अध्यक्षपदाचा पदभार स्विकारणार आहेत.जळगांव जिल्ह्यातील निसर्ग संवर्धन करणा-या सर्व संस्थांनी एकत्र येऊन या संमेलनाचे आयोजन केले आहे. जळगावच्या जैन हिल्सवरील ‘गांधी तीर्थ’ येथे दोन दिवसीय संमेलन भरणार आहे. संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना ‘पाणथळींचे संवर्धन आणि यावलचे पक्षी जीवन’ अशी आहे. माळी हे पक्षी, पर्यावरण, वन्यजीव छायाचित्रण क्षेत्रात अभ्यासक, लेखक व संशोधक म्हणून परिचीत आहेत. पक्षी, प्राणी जैवविविधता या विषयावर माळी यांची ८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच चार चित्रफितींचीही त्यांनी निर्मिती केली आहे. वन्यजीव छायाचित्रणाच्या निमित्ताने भारतातील ५० पेक्षा जास्त अभयाराण्य त्यांनी भेटी देत तेथील जैवविविधता जाणून घेली. तसेच नेपाळ, इंडोनेशिया, बाली येथेही त्यांनी भेटी दिल्या आहेत. राज्य शासनाकडून त्यांना वने व वन्यजीव संवर्धनाबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात ५०० पेक्षा जास्त ठिकाणी त्यांनी व्याख्याने व सादरीकरणातून विद्यार्थी व नागरीकांमध्ये वने व वन्यजीव, निसर्ग, पर्यावरणविषयक जनजागृती केली आहे. जहांगिर आर्ट गॅलरी, मुंबई, इंडोनेशिया, बाली तसेच नाशिक, जळगांव, बारामती, औरंगाबाद, यवतमाळ आदि शहरांमध्ये वन्यजीव विषयक छायाचित्र प्रदर्शने त्यांनी भरविली आहेत. ते नाशिक जिल्हा जैवविधिता समिती सदस्य असून महाराष्ट्र पक्षीमित्र, वाईल्डलाईफ हेरिटेज, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, पक्षी मित्र मंडळ नाशिक या संस्थाचे ते सक्रीय सभासद आहेत.
उत्तर महाराष्ट्राच्या पक्षी संमेलनाध्यक्षपदी नाशिकचे अनिल माळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 2:05 PM
नाशिक : फेब्रुवारीच्या १ व २ तारखेला जळगावमध्ये होणाऱ्या उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाध्यक्षपदी पक्षी अभ्यासक मॉडर्न हायस्कूलचे पर्यवेक्षक अनिल माळी ...
ठळक मुद्देमाळी यांची पुढील दोन वर्षांकरिता निवड ‘पाणथळींचे संवर्धन आणि यावलचे पक्षी जीवन’ माळी यांची ८ पुस्तके प्रकाशित झाली