नाशिक : दिल्ली येथील नेहरू स्टेडिअममध्ये झालेल्या अल्ट्रा रनिंगमध्ये नाशिकचे अॅथलेटिक्स प्रशिक्षक अनिरुद्ध अथनी यांनी सतत बारा तास रनिंग ट्रॅकवर धावण्याची स्पर्धा पूर्ण केली आहे. अशाप्रकारची स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले नाशिककर ठरले आहेत. अॅथलेटिक्स फेडरेशन आॅफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली आणि इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ अल्ट्रा रनर्स यांच्या नियमानुसार दिल्ली येथील एनईबी या संस्थेच्या वतीने भारतात प्रथमच ‘बारा तास स्टेडिअम रनिंग’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार, दि. १५ रोजी सायंकाळी या स्पर्धेला प्रारंभ झाला तर रविवारी सायंकाळी स्पर्धेचा समारोप झाला. यामध्ये स्टेडिअममधील रनिंग ट्रॅकवर सतत बारा तास धावकाला धावावे लागते. या स्पर्धेच्या पुढच्या चरणात पोहचण्यासाठी १४५ किमी अंतच चोवीस तासात पूर्ण करणे अपेक्षित असते.अथनी यांनी चोवीस तासात १७२.२ किमी अंतर पूर्ण करून स्पर्धेत आठवा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत एकूण ६० अनुभवी स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी २५ जणांनी निर्धारित वेळेत अंतर पूर्ण केले. पुढीलवर्षी या स्पर्धेचा पुढील टप्पा होणार आहे.क्षमतेचा कस लागणारी परीक्षाचया स्पर्धेमध्ये चोवीस तास स्टेडिअम ट्रॅकवर सतत धावणे म्हणजे धावपटूंच्या क्षमतेचा कस लागतो. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी धावपटूंमध्ये स्पर्धा असते. आंतरराष्टÑीय मानांकनाप्रमाणे अत्यंत काटेकोर अशी ही स्पर्धा असून, सर्व व्यवस्था त्या दर्जाचीच असते. धावकाला या चोवीस तासात पंधरा मिनिटांपेक्षा जास्त वेळ आराम करता येत नाही. - अनिरुद्ध अथनी, धावपटू
अनिरुद्ध अथनी धावले सलग बारा तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:10 AM