शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अनिताताई म्हणजे रचना, संघर्षाचा मिलाफ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 01:21 IST

समता आंदोलन, राष्ट्रसेवा दल, छात्रभारतीसारख्या विविध चळवळींतील संघटनांमध्ये कार्यरत नवीन कार्यकर्त्यांची नवीन पिढी निर्मितीचे रचनात्मक काम करण्यासोबतच विविध आंदोलनाच्या माध्यमातून वंचित, दुर्बल घटकांतील विद्यार्थी, महिलांसाठी संघर्ष करणाऱ्या साथी अनिता पगारे यांच्या ठिकाणी रचना आणि संघर्षाचा अनोखा मिलाफ असल्याचा सूर सोमवारी (दि. २९) साथी अनिता पगारे यांच्या ऑनलाइन शोकसभेत उमटला. 

ठळक मुद्देमेधा पाटकर, गणेश देवींनी व्यक्त केला शोक

नाशिक : समता आंदोलन, राष्ट्रसेवा दल, छात्रभारतीसारख्या विविध चळवळींतील संघटनांमध्ये कार्यरत नवीन कार्यकर्त्यांची नवीन पिढी निर्मितीचे रचनात्मक काम करण्यासोबतच विविध आंदोलनाच्या माध्यमातून वंचित, दुर्बल घटकांतील विद्यार्थी, महिलांसाठी संघर्ष करणाऱ्या साथी अनिता पगारे यांच्या ठिकाणी रचना आणि संघर्षाचा अनोखा मिलाफ असल्याचा सूर सोमवारी (दि. २९) साथी अनिता पगारे यांच्या ऑनलाइन शोकसभेत उमटला. तर चळवळीतील प्रत्येकाची मैत्रीण, मार्गदर्शिका आणि प्रचंड सकारात्मक विचारधारा असलेल्या अनिताताई स्त्रीवादी कार्यकर्ता कमला भसीन यांच्याशीही सहज मैत्री निभावताना चळवळीतील इतरांनाही प्रेरणा देणारा ऊर्जास्रोत असल्याचे मत राष्ट्र सेवादलाचे राज्य अध्यक्ष अर्जुन कोकाटे, प्रतिभा शिंदे, ॲड. उत्कर्षा रूपवते. सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांनी व्यक्त केले. महापुरुषांचा जीवन संघर्ष त्यांचा उर्जास्रोत होता. त्यामुळेच कोणत्याही चळवळीतील संघर्षात त्या नेहमीच अग्रेसर राहिल्या. मात्र ज्या काळात खऱ्या अर्थाने लढणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज होती, त्याच काळात त्यांनी चळवळीचा निरोप घेतल्याने मानवतेच्या, माणुसकीच्या आणि समतेच्या चळवळीची कधीही भरून न निघणारी हानी झाल्याचे नमूद करीत ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक उत्तम कांबळे यांच्यासह शांताराम चव्हाण, नितीन मते, सागर भालेराव आदींनी अनिता पगारे यांना श्रद्धांजली अर्पण केली. राजा कांदळकर यांनी सूत्रसंचालन केले.विद्रोही चळवळीची हानीअनिता पगारे यांच्या निधनाने सामाजिक चळवळीत कधीही भरून निघू शकणार नाही, अशी पोकळी निर्माण झाली असून  अनिताताई यांच्या रूपाने विद्रोही, बंडखोर आणि रचनात्मक कार्य करणाऱ्या आणि चळवळीची व्यापक समज असलेले अग्रणी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर,  राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी, आमदार कपिल पाटील, प्रा. संजय गोपाळ आदींनी व्यक्त केली. 

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिकMedha Patkarमेधा पाटकर