देवळाली कॅम्प : येथील सह्याद्री हॉलमध्ये गेल्या दोन दिवसांपासून आयोजित देशभरातील १४ छावणी परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित निनाद-२०१८ सांस्कृतिक महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला.देवळाली छावणी परिषद व रक्षा संपदा दक्षिण विभागाच्या वतीने आयोजित निनाद २०१८ सांस्कृतिक महोत्सव बक्षीस वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून रक्षा संपदा विभागाच्या डायरेक्टर जनरल दीपा बाजवा, साउथ कमांडचे प्रिन्सिपल डायरेक्टर एल. के. पेगू, डायरेक्टर संजीवकुमार, विभा शर्मा, असिस्टंट डीजी सोनम यांगडाल, खासदार हेमंत गोडसे, बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर पी.रमेश, उपाध्यक्ष मीना करंजकर, सीईओ अजय कुमार, प्रभावती धिवरे, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, आशा गोडसे, बाबूराव मोजाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांची समायोचित भाषणे झाली.यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. परीक्षक पंडित शंकरराव वैरागर, रोहित जंजाळे, वृषाली कोकाटे, मध्यमा गुर्जर आदींचा सत्कार करण्यात आला. आभार मुख्याधिकारी अजय कुमार यांनी मानले. यावेळी माजी उपाध्यक्ष बळवंत गोडसे, बसंत गुरुनानी, तानाजी करंजकर, भाऊसाहेब धिवरे, चंद्रकांत गोडसे आदी उपस्थित होते.पाहुण्यांच्या हस्ते निनाद-२०१८ सांस्कृतिक महोत्सवातील कनिष्ठ व वरिष्ठ अशा दोन्ही विभागांतील विजेतेपदाचा मान देवळाली छावणी परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळाला. वरिष्ठ गटात द्वितीय क्रमांक सेंट थॉमस, तर कनिष्ठ गटात बबिना छावणी परिषद विजयी झाले.
निनाद महोत्सवाचे बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 1:11 AM