नाशिक : आत्मा मालिक ध्यानपीठच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिंहस्थात अन्नछत्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमदेखील घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पंचवटी येथे झालेल्या या बैठकीप्रसंगी २७ आॅगस्ट ते २९ सप्टेंबर या कालावधीत ध्यान शिबिर, सत्संग सोहळा व अन्नदान आदि कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाची तयारी सुरू झाली असून, सत्संग मंडळांकडे अनेक कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या बैठकीचे आयोजन मखमलाबाद आत्मा मालिक मंडळाने केले होते. यावेळी सिंहस्थातील धार्मिक कार्यासाठी अनेक मान्यवरांनी व दानशुरांनी वस्तू तसेच पैशांच्या स्वरूपात मदत जाहीर केली. यावेळी जंगलीदास महाराज व दयानंद महाराज यांच्या हस्ते देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मखमलाबाद परिसरात स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. सिंहस्थामध्ये दररोज दहा हजार भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, असे भगवान दौंड यांनी सांगितले. या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी सुरू असून, आत्मा मालिक कुंभमेळा समितीकडे या महोत्सवाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
‘आत्मा मालिक’ तर्फे अन्नदान
By admin | Published: June 14, 2015 11:32 PM