नाशिक : ऐन सणासुदीच्या काळात गोदामाईचे पात्र अस्वच्छ झाल्याने अत्यंत विदारक चित्र दृष्टीस पडत आहे. यामुळे भाविक पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासनाची उदासिनता याला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दिपावलीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेला वेग आला असताना गोदावरीच्या स्वच्छतेचा मात्र प्रशासनाला विसर पडल्याने संताप व्यक्त होत आहे.नाशिककरांची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीची दुरवस्था पाचवीलाच पुजली आहे. नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यास महापालिका अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. ऐन सणासुदीच्या काळात गोदावरीचे रुपडे विदारक झाल्याने प्रदूषणाची पातळी वाढली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न होत असताना दुसरीकडे गोदावरीच्या स्वच्छता अभियानदेखील हाती घेण्याची मागणी होत आहे.
ऐन दिवाळीत गोदामाईच्या स्वच्छतेचा मनपाला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 6:05 PM
नाशिक : ऐन सणासुदीच्या काळात गोदामाईचे पात्र अस्वच्छ झाल्याने अत्यंत विदारक चित्र दृष्टीस पडत आहे. यामुळे भाविक पर्यटकांमध्ये तीव्र ...
ठळक मुद्देमहापालिका प्रशासनाची उदासिनता कारणीभूत असल्याचा आरोप नदीपात्रावर शेवाळाचा हिरवा गालिचा