लोकमत न्यूज नेटवर्कनगरसूल : येथे शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी नगरसूल व परिसरातील आंदोलनकर्त्यांनी नगरसूल ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळी ८ वाजता जमून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. यानंतर शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी नगरसूल परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकरी संपाच्या पहील्या दिवसापासून विविध प्रकारे शासनाचा निषेध व्यक्त केला. सोमवारी महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त पाठिंबा देत गावातील व्यवसायीकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली. गावात दूध व भाजीपाला विक्र ी बंद ठेवण्यात आली होती. येवल्यात शेतमाल पाठविला गेला नाही. यावेळी शासनाच्या प्रतीकात्मक अंत्ययात्रा येवला-नांदगाव रस्त्यावर नेऊन त्याचे दहन करण्यात आले.
नगरसूल येथे शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा
By admin | Published: June 06, 2017 3:00 AM