रोटरीच्या वतीने कृषी मंथन उपक्रम
नाशिक : जागितक मृदा दिनानिमित्ताने रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने निफाड तालुक्यातील उगाव येथे शेतकऱ्यांसाठी कृषी मंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘कृषीचा विकास हाच रोटरीचा ध्यास’ या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हेाते. शेतकरी, महिला बचतगट आणि युवकांना वर्षभर या संकल्पेतून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
नियोजित उड्डाणपुलाला नागरिकांचा विरोध
नाशिक : प्रभाग क्रमांक २५ मध्ये होऊ घातलेल्या नियोजित उड्डाणपुलाला स्थानिक नागरिकांनी विरोध सुरू केला आहे. दुर्गानगर, त्रिमूर्ती चौक ते संभाजी महाराज चौकापर्यंत पुलाचे नियोजन करण्यात आलेले आहे. या ठिकाणी उड्डाणपुलास व्यापाऱ्यांचा विरोध असून, पुलाऐवजी भुयारी मार्ग तयार करण्याची मागणी या व्यापाऱ्यांनी केली आहे.
आरोग्य तपासणी शिबिर
नाशिक : पश्चिम मतदारसंघातील सिडको परिरसरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास भाऊसाहेब जाधव, प्रदीप मुंढे, विकास सोनवणे, जीवन रावते, निलेश भंदुरे आदी उपस्थित होते.