नाशिक : समाजातील सर्व स्तरातील, वयोगटातील सामाजिक आणि लैंगिक शोषणाचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न ‘ती’ या नाटकाद्वारे करण्यात आला.कामगार कल्याण नाट्य महोत्सवात बुधवारी जळगावच्या मेहरुणमधील कामगार कल्याण मंडळ, ललित कला भवन यांच्या वतीने ‘ती’ नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. विभावरी मोराणकर लिखित आणि प्रदीप भोई दिग्दर्शित या नाटकात महिलांच्या समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयास करण्यात आला. वृद्ध महिला आणि स्त्रीची अचानक होणारी भेट. त्यानंतरच्या त्यांच्या संवादातून जुन्या जखमा पुन्हा भळभळा वाहू लागतात. त्या संवादातूनच त्यांना असे कळते की त्या मायलेकी आहेत. परिस्थितीमुळे दत्तक द्यावे लागलेल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची कहाणी त्यात मांडण्यात आली आहे. अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर महिलांची मानसिक स्थितीदेखील मांडण्याचा प्रयत्न नाटकातून करण्यात आला. नाटकातील बहुतांश कलाकार आणि तंत्रज्ञ नवखे असल्याचा प्रत्यय सादरीकरणातून जाणवत होता.आजचे नाटक : वारूळवेळ : सायंकाळी ६ वाजता
महिलांच्या सामाजिक, लैंगिक शोषणावर ‘ती’द्वारे भाष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:14 AM