कर्ज काढण्यासाठी भाजप सरसावल्यानंतर शिवसेनेने त्यावर टीका केली हेाती. त्यावर पलटवार करताना महापौर सतीश कुलकर्णी यांनी विरोधी पक्षनेते बेारस्ते यांची टीका असमंजसपणाची असल्याचा आणि विकासकामांना ते विरोध करीत असल्याची टीका केली होती. त्याला बोरस्ते यांनी पुन्हा उत्तर देताना खोटे बेाला पण रेटून बेाला ही भाजपची भूमिका असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या कार्यालयात सोमवारी (दि.१८) झालेल्या पत्रकार परीषदेत बोरस्ते आणि गटनेते विलास शिंदे यांनी भाजपवर टीका करताना यापूर्वी दत्तकपित्याने मुख्यमंत्री असताना नाशिककरांसाठी किती निधी दिला ते जाहीर करावे, असे आव्हान शिंदे यांनी दिले.
महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसताना कर्ज काढायचे ठरवले तर ते मौजमजेसाठी नाही. किमान कोणत्या कामासाठी कर्ज काढणार हे तर जाहीर करावे, असा प्रश्न त्यांनी केला. महापालिकेला खड्ड्यात घालणे हा शेखचिल्लीसारखा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
इन्फो..
मेट्रोचा काय संबंध?
नाशिकमध्ये निओ मेट्रो सुरू करण्यास शिवसेनेने विरेाध केला. हा आरोपच हास्यास्पद असल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला. महामेट्रो हा विषयच केंद्र शासनाचा आहे. त्यात राज्य शासनाचा काय संबंध असा प्रश्नही त्यांनी केला.