या स्पर्धेत नाशिक विभागात प्रथम व राज्यात द्वितीय क्रमांक मिळवलेल्या श्रद्धा अमृतकर तसेच विभागात द्वितीय क्रमांक मिळवलेल्या राखी मोरे यांचा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण उद्यम विकास प्रकल्प अध्यक्ष लीना बनसोड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी बनसोड यांनी दोघा विजेत्या महिलांना उखाणे म्हणायला लावत त्यांचे कौतुक केले. नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम प्रकल्पाची त्रैमासिक आढावा बैठक घेण्यात येऊन पुढील काळात बचतगटांना कर्ज वाटप करून अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक उज्ज्वला बावके, संजय गायकवाड, अमोल लोहकरे, अर्धेन्दू शेखर, सुरेखा पाटील, कैलास शिरसाठ, एम. आर. गायकवाड, राजेंद्र निकम, हेमंत काळे, संदीप गडाख आदी उपस्थित होते.