नाशिक : राज्यातील सकल मराठा समाजातर्फे मुंबईत ९ आॅगस्ट क्रांतिदिनी काढण्यात येणाºया मराठा क्रांती मोर्चाचे नियोजन अंतिम टप्प्यात असून, मोर्चात सहभागी होण्याचा मार्ग व मोर्चेकºयांसाठी आचारसंहिता सोशल मीडियातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे जाहीर करण्यात आलेल्या नकाशानुसार मुंबईतील मोर्चा वीर जिजामाता उद्यानापासून निघून आझाद मैदानापर्यंत पोहोचणार आहे.कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्याकांडाच्या घटनेचा निषेध, मराठा आरक्षण आणि अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील मागण्यांसाठी मराठी क्र ांती मोर्चातर्फे राज्यातील विविध जिल्ह्णांमध्ये मराठा समाजाने ऐतिहासिक मोर्चे काढले आहेत. या सर्व मोर्चांचा शेवट मुंबईत ९ आॅगस्टला क्रांतिदिनी होणार आहे. त्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे युद्ध पातळीवर नियोजन सुरू आहे. मुंबईतील मराठा मोर्चासाठी महामार्गाने मुंबईत येणारे मोर्चेकरी व रेल्वेमार्गे येणारे मोर्चेकरी यांच्यासाठी वाहनतळ व थांब्यांचा नकाशा जाहीर करण्यात आला आहे. या न काशानुसार भायखळा येथील वीर जिजामाता उद्यान येथून ६ किमी अंतर चालून मोर्चा आझाद मैदानापर्यंत पोहोचणार आहे. मोर्चात सहभागी होण्यासाठी येणाºया वाहनांना वडाळा परिसरातील बीपीटी आरसीडी यार्ड व इस्टर्न एक्स्प्रेस वेला लागून ए, बी, सी, डी सिमेंट शेड भागात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सिमेंट शेडकडे जाण्यासाठी इस्टर्न एक्स्प्रेस वेवरून मोर्चासाठी येणाºया वाहनांना भक्तिपार्क येथून एक्झिट घ्यावी लागणार आहे. खासगीवाहनांनी येणाºया मोर्चेकºयांना वाहनतळावर वाहने लावून रेल्वेने वीर जिजामाता उद्यानापर्यंत पोहोचता येणार आहे. मोर्चात सहभागी होणाºयांसाठी सूचनाअनोळखी वस्तूला हात लावू नये, अशी वस्तू आढळल्यास पोलीस अथवा स्वयंसेवकांच्या नजरेस आणून द्यावी.संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.मूक मोर्चा असल्याने कोणीही जाताना अथवा येताना घोषणाबाजी करू नये.सोबत येणाºया सर्व सहकाºयांनी ड्रायव्हरसह साथीदारांचे मोबाइल नंबर नोंदवून घ्यावेत.मोर्चातील साहित्य टी-शर्ट, टोप्या योग्य रीतीने परिधान कराव्यात. झेंडे, स्टिकर, नामफलक, घोषणाफलक सर्वांना दिसतील असे असावे.मोर्चात सहभागी होणाºया प्रत्येकाने स्वत:चे जेवण, पाणी व छत्री, रेनकोट सोबत आणावे.मधुमेह, रक्तदाब किंवा अन्य आजारग्रस्त मोर्चेकºयांनी त्यांची औषधे व ओळखपत्र सोबत बाळगावे.मोर्चेकºयांनी शक्यतो रेल्वेने प्रवास करावा. महामार्गाने येणाºया मोर्चेकºयांनी वाहने सावकाश चालवावी.
मुंबईतील मराठा मोर्चाचा मार्ग जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 11:41 PM