शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
3
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
5
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
6
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची पोस्ट, म्हणाला- ED लागेल की बडतर्फी होईल?
7
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
8
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
9
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
10
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
11
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
12
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
13
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
14
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
15
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
16
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
17
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
18
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
19
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

जिल्ह्याची अंतिम मतदार यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 1:05 AM

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने विधानसभा मतदार संघनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर केली असून, शुक्रवारपासून जिल्ह्णातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना पाहण्यासाठी ही यादी उपलब्ध होणार आहे. सप्टेंबर महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीनंतर नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या मतदारांची संख्या पाहता, जिल्ह्णात नव्याने ५५ हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली असून, या सर्वांना येत्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

ठळक मुद्देमतदान केंद्रांवर प्रसिद्धी : ५५ हजार मतदारांची वाढ

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने विधानसभा मतदार संघनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर केली असून, शुक्रवारपासून जिल्ह्णातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना पाहण्यासाठी ही यादी उपलब्ध होणार आहे. सप्टेंबर महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीनंतर नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या मतदारांची संख्या पाहता, जिल्ह्णात नव्याने ५५ हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली असून, या सर्वांना येत्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.निवडणूक आयोगाने यंदा जुलै महिन्यात मतदार पुनरीक्षण मोहीम राबविली असता, त्यात नवमतदारांची अधिकाधिक नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यासाठी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर बारावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच नाव नोंदणीची सोय करण्यात आली होती. याशिवाय ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांनाही नव्याने संधी देण्यात आली. साधारणत: तीन महिने राबविलेल्या या मोहिमेनंतर सप्टेंबरअखेर आयोगाने जिल्ह्णाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. त्यात ४२,६०,३९२ मतदारांचा समावेश होता. त्यानंतरही आयोगाने पुन्हा मतदार नोंदणीची संधी उपलब्ध करून दिली. या काळात सुमारे दोन लाखांहून अधिक मतदारांचे अर्ज स्थानिक पातळीवर प्राप्त झाले. त्याची छाननी केली असता, दुबार, मयत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात आल्यानंतर अंतिम मतदार यादीत ४३ लाख १५ हजार ५७८ मतदारांचा समावेश करण्यात आला. त्यात २२ लाख ६७ हजार ५४७ पुरुष, तर २० लाख ४७ हजार ९६० महिलांचा समावेश आहे. प्रारूप मतदार यादी व अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्णात ५५,१८६ मतदारांची वाढ झाली आहे. या मतदार यादीत ७१ तृतीयपंथीय मतदारांचाही समावेश आहे. गुरुवारी ही अंतिम मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील, प्रांत कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली असून, शुक्रवारपासून जिल्ह्णातील ४४४६ मतदान केंद्रांवर मतदारांसाठी ती पाहण्यासाठी उपलब्ध असेल. अंतिम मतदार यादी सदोषलोकसभा निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मतदार यादीतील चुका टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने पूरेपूर प्रयत्न करूनही अंतिम मतदार यादीत अनेक मतदारांची नावे, आडनावे गायब झाली असून, काहींची छायाचित्रेही नाहीत. विशेष करून दिंडोरी मतदारसंघातील मतदार यादीची छपाई करताना दोष झाला असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. विधानसभा मतदार संघनिहाय मतदारांची संख्या नांदगाव- ३,१०,५७३,मालेगाव मध्य- २,६२,७४५,मालेगाव बाह्ण- ३,२३,४६७,बागलाण- २,६८,१७६,कळवण- २,६१,५२०,चांदवड- २,७१,९०९,येवला- २,८१,९४५,सिन्नर- २,८४,०७३,निफाड- २,५८,०१७,दिंडोरी- २,९०,१५८,नाशिक पूर्व- ३,४२,२२२,नाशिक मध्य- २,९२,८२६,नाशिक पश्चिम- ३,६९,७१३,देवळाली- २,५०,९०७,इगतपुरी- २,४७,३३०.