नाशिक : कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या जागा वाटपात नाशिक जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वाट्याला सोडण्यात आल्याने या दोन्ही जागांवर संभाव्य उमेदवारांची नावे मतदारात चर्चिली जाऊन त्यादृष्टीने त्यांनी प्रचाराला सुरुवातही केलेली असताना पक्षाने गुरुवारी जाहीर केलेल्या राज्यातील दहा जागांमध्ये नाशिकच्या दोन्ही जागेवरील एकाही उमेदवाराचे नाव नसल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे. पक्षाची दुसरी यादी लवकरच जाहीर होईल, असे सांगितले जात असले तरी, तीकधी होईल व उमेदवार कोणअसेल याबाबतची साशंकता कायम आहे.लोकसभा निवडणुकीचा राज्यातील पहिला टप्पा सोमवार, दि. १८ मार्चपासून सुरू होत असून, त्यामुळे बुधवारी कॉँग्रेसने पाच उमेदवारांची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभेच्या दहा जागांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांची नावे जाहीर केली, तर हातकणंगले ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडून लक्षद्विपच्या एका जागेवरील उमेदवाराचीही घोषणा करण्यात आली. या यादीमध्ये नाशिक व दिंडोरीच्या जागेचाही समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना ती मात्र फोल ठरली.ज्या इच्छुकांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली त्यांनी पवार यांच्या दौऱ्यानंतर आपल्या राजकीय गाठीभेठींवर भर कायम ठेवला असून, गावोगावचे दौरे केले जात आहेत. नाशिकमधून भुजबळ कुटुंबीयांपैकी कोण? असा प्रश्न असून, दिंडोरीतून डॉ. भारती पवार की धनराज महाले यांचा फैसला पक्षाच्या नेत्यांना घ्यायचा आहे. उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांकडून प्रयत्न सुरू असले तरी, गुरुवारच्या यादीत नावे जाहीर होण्याची शक्यता फोल ठरली आहे. आता पक्षाच्या दुसºया यादीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.पवार यांच्या दौºयानंतरही प्रतीक्षाचविशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवस नाशकात तळ ठोकून संभाव्य उमेदवारांची चाचपणी व त्याचबरोबर मतदारांचाही कल जाणून घेतला. त्यामुळे पवार यांनी राजकीय अंदाज बांधून उमेदवार निश्चित केले असावेत असेच मानले जात असताना पहिल्या यादीत कुणाचाही नंबर लागला नाही.