लोकमत न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगरपालिकेची मुदत दि. १७ डिसेंबर २०१७ रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. २१) प्रभागरचनेची आरक्षण सोडत काढण्यात आल्याने निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. विशेष म्हणजे राजकीय पक्षांनी प्रत्येक प्रभागात दोन याप्रमाणे उमेदवारही निश्चित केले आहेत. आमचच पक्ष सत्तेत येणार अशी चर्चा सुरू आहे. पण नवीन नियमानुसार झालेले आरक्षण निश्चितच धक्कादायक म्हणावे लागणार आहे. आरक्षणाच्या जागा त्याच मात्र उमेदवारी दुसरीकडेच त्यामुळे सर्वच गणित चुकले आहे. अशाही परिस्थितीत कही खुशी कही गम असे चित्र दिसत आहे.शुक्रवारी (दि. २१) सोडत काढून प्रभागनिहाय व त्यातील वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी दीपमाला चौरे व मुख्याधिकारी डॉ. चेतना मानुरे-केरूरे यांना संजय मिसर व अमोल दोंदे यांनी साहाय्य केले.प्रभागनिहाय आरक्षणप्रभाग क्र . १ : चौकी माथा-इंदिरानगर-रोकडेवाडी१ अ) : अनु. जमाती, स्त्री, १ ब) चौकीमाथा- सर्व साधारण प्रभाग क्र . २ : गुळवेवाडी -दोबाडेवाडी-तलाठी कॉलनी-कामगार कॉलनी व पोस्ट लेन, २ अ) अनु.जमाती स्त्री, २ ब) सर्वसाधारणप्रभाग क्र . ३ : राजवाडा-इंदिरानगर ३ अ) अनु. जमाती, ३ ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)प्रभाग क्र . ४ : पाटील लेन-कडलग लेन ४ अ) अनु. जमाती (स्त्री), ब) नागरिकांचाच मागास प्रवर्गप्रभाग क्र . ५ : गोकुळदास लेन-गायधनी लेन-तेली गल्ली-कोथे गल्ली ५ अ) अनु. जाती (स्त्री), ५ ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग क्र . ६ : गढई-पाचआळी-बल्लाळेश्वर चौक, ६ अ) अनु. जमाती, ६ ब) सर्वसाधारण (स्त्री) प्रभाग क्र . ७ : मेनरोड-रतनलेन-लक्ष्मीनारायण चौक-पाचआळी७ अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री), ७ ब) सर्वसाधारण प्रभाग क्र . ८ : टेलिफोन एक्सचेंज कॉलनी-वेताळआळी-भांगरे गल्ली८ अ) अनु. जमाती (स्त्री), ८ ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग,८ क) सर्वसाधारण.
नगरपालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 1:02 AM