शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

संजीवनी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 11:03 PM

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या संजीवनी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला.

सिन्नर : येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या संजीवनी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला.संस्थेचे उपाध्यक्ष एम.जी. कुलकर्णी, उद्योजक अतुल अग्रवाल यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर अध्यक्ष अनिल करवा, अधीक्षक अरुणा चोथवे, मुख्याध्यापक माया गोसावी, माधवी पंडित, सीमा देशपांडे, गीता कुलकर्णी आदींसह मान्यवर उपस्थित होते. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनींनी कथक करून ईशस्तवन सादर केले.सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जयंती, नारळी पौर्णिमा, नवरात्र, जागरण गोंधळ, गोपाळकाला, देशभक्तिपर गीते, बालगीते, नाताळ गीत आदी गीतांवर वैयक्तिक व सामूहिक नृत्य सादर करून पालकांची मने जिंकली. यानंतर झालेल्या कार्यक्रमात अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात. आपल्या मुलांना मोबाइल व बाह्य खाद्यपदार्थांपासून दूर ठेवण्याचा संदेश त्यांनी पालकांना दिला. शाळेतील सर्व मुले आपली आहेत असे समजून पालकांनी व शिक्षकांनी वागावे, जागरूक राहावे, स्पर्धा परीक्षांसाठी मुलांना तयार करावे, असे आवाहन कुलकर्णी केले. मुख्याध्यापक गोसावी यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला. यानंतर विविध स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. ४२व्या कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धेत शाळेने सादर केलेल्या ‘बालपण हरवलंय आमचं’ या प्रयोगातील सहभागी विद्यार्थी कलाकारांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सुनंदा नागपुरे, हिरा गोरे, मनीषा क्षत्रिय, सुरेखा भोये, नितीन ठाकरे, महेश गुंजाळ, कावेरी राऊत, सुवर्णा मते, अंजली मावलकर, संतोष गायकवाड आदींसह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक