नाशिक : डिस्ट्रिक्ट सेकंडरी टिचर्स अॅण्ड नॉनटिचिंग एम्प्लॉई को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या (एनडीएसटी) सर्वसाधारण सभेतील गोंधळाची परंपरा जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनी यावर्षीही कायम राखली. यावर्षी संचालक मंडळाने एनडीएसटीच्या वार्षिक अहवालात राजकीय नेत्यांचे फोटो छापल्याने शिक्षकांनी विरोध दर्शवित गोंधळ घातला. त्याचप्रमाणे संचालक मंडळ 7.50 टक्के लाभांश वाटपासाठी आग्रही असताना नफ्यातील 10 टक्के लाभांश वाटपाच्या मागणीसाठी शिक्षकांनी गोंधळ घातला. त्यामुळे अखेर संचालक मंडळाने 8 टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
एनडीएसटीच्या वार्षिक सभेत गोंधळाची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 4:04 PM