सभेत रूपाली जाधव यांनी गेल्या वर्षभरात क्लबमार्फत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. सन २०२१-२२ या वर्षासाठी कार्यकारी समितीची घोषणा करण्यात आली. समितीत अध्यक्षपदी साधना पाटील, सेक्रेटरी रेखा वाघ, उपाध्यक्ष कल्पना जाधव, कोषाध्यक्ष सुजाता पाठक, मीनाक्षी जाधव, कविता जाधव तसेच स्मिता येवला, सीमा खैरनार, संगीता खैरनार, पूजा दंडगव्हाळ, रंजिता मोरे, संगीता खानकरी यांचा समावेश करण्यात आला. क्लब अध्यक्ष रूपाली जाधव यांनी चार्टर प्रेसिडेंट रूपाली कोठावदे तसेच मागील वर्षीच्या पदाधिकाऱ्यांना इनरव्हिल लोगो, थीम लोगो असणारे कॉफी मग देऊन सन्मानित केले. साधना पाटील यांनी पुढील वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून योजना स्पष्ट केल्या.
फोटो- २४ सटाणा इनरव्हील
इनरव्हिल क्लब ऑफ सटाणा मिडटाऊनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी उपस्थित पदाधिकारी.
===Photopath===
240621\24nsk_45_24062021_13.jpg
===Caption===
फोटो- २४ सटाणा इनरव्हील इनरव्हिल क्लब ऑफ सटाणा मिडटाऊनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी उपस्थित पदाधिकारी.