नायगाव : येथील सुर्योदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
संस्थेचे अध्यक्ष मोहन कातकाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस जिल्हा दुध संघाचे माजी अध्यक्ष दिलीप कातकाडे, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक रामनाथ बोडके, दिघोळे वाचनालयाचे अध्यक्ष चंद्रकांत बोडके, अर्जुन बर्डे, त्रंबक भगत, नितीन लोहकरे आदी प्रमुख उपस्थित होते.ग्रामीण भागाच्या विकासात सहकार विभागाचा महत्वपूर्ण वाटा असल्याचे गोदा युनियन कृषक संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण सांगळे यांनी या सभेच्या निमित्ताने बोलताना सांगितले. संस्थेचे आर्थिक अहवाल वाचन व्यवस्थापिका सुशिला उगले यांनी केले. अध्यक्ष कातकाडे यांनी आर्थिक वर्षात संस्थेला २ लाख अठरा हजार रुपये नफा झाल्याचे सांगितले. संस्थेने दोन वर्षात नायगाव परिसरातील अनेक बेरोजगारांना विविध उद्योग धंद्याना कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. संस्था लवकरच कर्ज पुरवठा वाढवणार आहे. तसेच नायगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांनाही कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे संचालक राजेंद्र काकड यांनी सांगितले.यावेळी उपाध्यक्ष अजय हुळहुळे, पंकज जेजुरकर, सुनिता पाबळे, सुनंदा आव्हाड, विश्वास कुटे, उत्तम पाबळे आदी संचालक, भिकाजी गिते, अजित गिते, अर्जुन सानप, पुंडलीक दिघोळे, प्रकाश आव्हाड आदींसह सभासद उपस्थित होते.