नाशिक : शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सध्याची महापालिकेची आणि काही खासगी रुग्णालये अपुरी पडत आहे त्या पार्श्वभूमीवर आता आणखी काही नवीन खासगी रुग्णालयांची मदत घेतली जाणार आहे. महापालिकेने एकूण १०६ रुग्णालयातील ३१६ बेड््स आता कोरोनाबाधितांसाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकेकडे आता १ हजार ९१ खाटा उपलब्ध झाल्या आहेत.मालेगावनंतर नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत वेगाने वाढली आहे. किंबहूना शहरात दाट वस्त्यांमध्ये आता कोरोनाचा उद्रेक झाल्याचे दिसते. ही संख्या वाढतच जाणार आहे. सध्याच्या रुग्णांच्या वाढीचा वेग पाहता आता अवघ्या दोन-तीन दिवसांत ही संख्या हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने आता यासंदर्भात तयारी आरंभली आहे. मनपाने सुरुवातीला ३७५ खाटांची व्यवस्था केली होती. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात शंभर खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय खासगी रुग्णालयांच्या मदतीने चारशे खाटा वाढविल्या होत्या. मात्र, नंतर कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मनपाने खासगी रुग्णालयातील खाटा अधिग्रहीत करण्याची तयारी पूर्ण केली आहे. शहरातील तीसपेक्षा अधिक खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयांची संख्या असा निकष ठेवला होता. त्यानुसार १०६ रुग्णालयांमध्ये ३१६ खाटा उपलब्ध झाल्या आहेत.शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता खासगी रुग्णालयातील खाटा आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात १०६ रुग्णालयात पंधरा ते वीस टक्के खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. यात ४३ अति दक्षता बेड आहेत, तर तेरा व्हेंटिलेटरही उपलब्ध होणार आहेत. सध्या शहरात एकूण १ हजार ९१ खाटा उपलब्ध झाल्या आहेत.
कोरोनाबाधितांसाठी होणार आणखी तीनशे खाटांची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 11:44 PM
शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सध्याची महापालिकेची आणि काही खासगी रुग्णालये अपुरी पडत आहे त्या पार्श्वभूमीवर आता आणखी काही नवीन खासगी रुग्णालयांची मदत घेतली जाणार आहे. महापालिकेने एकूण १०६ रुग्णालयातील ३१६ बेड््स आता कोरोनाबाधितांसाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकेकडे आता १ हजार ९१ खाटा उपलब्ध झाल्या आहेत.
ठळक मुद्देपूर्वदक्षता : खासगी रुग्णालयांकडून घेतली मदत