नाशिक : राज्यातील सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे सरकारमध्ये महत्वाच्या महामंडळे तसेच विविध मंत्रालयात वरिष्ठ पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरू झाला आहे. त्यातूनच माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नियुक्ती केलेल्या राज्यातील औद्योगिक विकास महामंडळातील नऊ प्रादेशिक अधिकाऱ्यांची सेवा महसूल विभागाकडे वर्ग करून त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
या बदल्यांची त्याची अधिकृत ऑर्डर जाहीर करण्यात आली नाही नवीन नियुक्तीमध्ये नाशिकच्या प्रादेशिक अधिकारीपदी उदय किसवे यांची नियुक्ती करण्यात येवून नितीन गवळी यांची उचलबांगडी झाली आहे. या संदर्भात गुरूवारी (दि.८) रोजी उशीरा उद्योग विभागाने आदेश काढले आहेत.
त्यात औरंगाबादचे राजेश जोशी, नाशिकचे नितीन गवळी, पुण्याचे प्रवीण ठाकरे, पनवेलचे रविंद्र बोंबले, महापे येथील सतिष बागल, ठाण्याचे विजयसिंह पाटील, औद्योगिक विकास महमंडळातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर, संजय मोरे, फरोज मुकादम या नऊ प्रादेशिक अधिकाऱ्यांची सेवा मूळ महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आली. त्याच बरोबर २० अधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यात नाशिकच्या औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारीपदी उदय किसवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.