शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

मुख्यमंत्र्यांचा मनपाला आणखी एक दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:20 AM

राज्यात आणि महापालिकेत भाजपाची सत्ता असताना स्थानिक स्तरावर सध्या अच्छे दिन नाहीत हे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेने अधोरेखित झाले आहे. पाणीपुरवठा यंत्रणेबरोबरच मलनिस्सारण यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीच्या खासगीकरणाचा महासभेने फेटाळलेला प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखंडित केला आहे. त्यामुळे या दोन्ही कामांच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देठराव विखंडित : पाणीपुरवठा, मलवाहिकांचे खासगीकरण होणार

नाशिक : राज्यात आणि महापालिकेत भाजपाची सत्ता असताना स्थानिक स्तरावर सध्या अच्छे दिन नाहीत हे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेने अधोरेखित झाले आहे. पाणीपुरवठा यंत्रणेबरोबरच मलनिस्सारण यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीच्या खासगीकरणाचा महासभेने फेटाळलेला प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखंडित केला आहे. त्यामुळे या दोन्ही कामांच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.जुलै महिन्यात झालेल्या महासभेत प्रशासनाने यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले होते. मात्र करवाढीवरून आयुक्त तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्ष वाढत गेला होता. त्यामुळे करवाढीबरोबरच आयुक्तांनी सादर केलेले बहुतांशी प्रस्ताव महासभेने फेटाळले होते. महापालिकेच्या पाणीपुरवठा व आरोग्य अभियांत्रिकी विभागात कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्याने तुंबलेल्या मलवाहिका प्रवाही करणे तसेच चेंबरची सफाई करणे, ढापे बदलणे महत्त्वाचे म्हणजे मलजल उपसा केंद्र चालविणे, विशिष्ट मापदंडानुसार प्रक्रियायुक्त पाणी सोडणे अशी विविध कामे खासगीकरणातून करून घेण्यात येणार होती. तसेच पाणीपुरवठाअंतर्गत जलकुंभाची व व्हॉल्व्हची निगा राखून दुरुस्ती करणे, वितरण वाहिकेची देखभाल करणे, पाणी मीटरचे दरमहा रिडिंग घेऊन त्यानुसार पाणी बिल तयार करून ग्राहकांना वितरित करणे यांसह विविध कामे प्रशासनाने प्रस्तावाद्वारे नमूद केली होती. मात्र हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता.आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सदरचे ठराव विखंडनासाठी पाठविल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाची बाजू घेत महासभेचा ठराव रद्दबातल केला आहे. यापूर्वी महापालिका शिक्षण मंडळाचे गठन करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने फेटाळला होता. शहरात बससेवेसाठी परिवहन समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला फिरवण्यास भाग पाडले. कंपाउंडिंग स्कीमची मुदतदेखील कमी करण्यास सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसState Governmentराज्य सरकार