संजय पाठक, नाशिक: महापालिकेच्या वेबसाईटवर पुन्हा एकदा सायबर हल्ला झाला असून हॅकर्स कोणत्याही प्रकारची माहिती या ठिकाणी अपलोड करू शकतात अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे टेंडर किंवा अन्य प्रकारची माहिती सूचना या ठिकाणी अपलोड होऊ शकतात आणि त्यातून नागरिकांचा गैरसमज होऊ शकतो असे तज्ञांचे म्हणणे आहे.
नाशिक महापालिकेच्या वेबसाईटवर यापूर्वी देखील हल्ले झाले आहेत, मात्र सगळा डाटा रिकव्हर करण्यात महापालिकेला यश आलंय. यंदा मात्र सायबर हल्ला करताना त्या ठिकाणी माहिती किंवा कोणत्या प्रकारची माहिती एडिट करता येईल अशा प्रकारची व्यवस्था केली आहे, त्यामुळे टेंडरच्या नियमात किंवा अन्य काही बदल होऊ शकतात त्यातून महापालिकेचे नुकसान होऊ शकतो, असा अंदाज सायबर तज्ञ तन्मय दीक्षित यांनी व्यक्त केला आहे. महापालिकेने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही दीक्षित यांनी केली आहे.