नाशिक : जिल्ह्यातील स्वाइन फ्लूचा विळखा वाढू लागला असून, येवला तालुक्यातील एरंडगाव येथील एका ६८ वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लूने बळी गेला आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्णात स्वाइन फ्लू व स्वाइन फ्लू सदृश आजाराच्या बळींची संख्या २० वर पोहोचली आहे. या महिलेस रविवारी (दि.९) या कक्षात दाखल करण्यात आले होते.पुणे येथील प्रयोगशाळेने त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे संकेत दिले होते. गेल्या चार दिवसांपासून स्वाइन फ्लू कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी (दि. १३) त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश भोई यांनी जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षास भेट देऊन रुग्णांची चौकशी केली. तसेच आढावा बैठक घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शनही केले. तर शनिवारी (दि.१५) प्रत्यक्ष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्णात वातावरणातील बदल व अनियमित पाऊस यामुळे रुग्ण संख्येत वाढ झाली असून, सन २०१८ मध्ये नाशिक जिल्ह्णात १६ मृत्यू झाल्याने गणेशोत्सव काळात योग्य प्रकारे काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. आढावा बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, प्रभारी सहायक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गुंजाळ, डॉ. अनंत पवार, व्ही. डी. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी विजय डेकाटे, जयराम कोठारी आदी उपस्थित होते.दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षाची मर्यादा १९ रुग्णांची असताना येथे २३ रुग्ण दाखल झाल्याने प्रशासनाची धांदल उडाली आहे. यातील एका अत्यवस्थ रुग्णास अतिदक्षता कक्षात हलविण्यात आले आहे. सध्या १२ पुरुष व १० महिला स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेत आहेत.
स्वाइन फ्लूने आणखी एका महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:12 AM
जिल्ह्यातील स्वाइन फ्लूचा विळखा वाढू लागला असून, येवला तालुक्यातील एरंडगाव येथील एका ६८ वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लूने बळी गेला आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्णात स्वाइन फ्लू व स्वाइन फ्लू सदृश आजाराच्या बळींची संख्या २० वर पोहोचली आहे. या महिलेस रविवारी (दि.९) या कक्षात दाखल करण्यात आले होते.
ठळक मुद्दे१२ पुरुष, १० महिला रुग्णांवर उपचार सुरू