नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंंढे यांनी परस्पर केलेली करवाढ फेटाळल्यानंतर बहुतांशी नगरसेवकांची हौसले बुलंद झाले असून, त्यानुसार आता प्रशासनाच्या विरोधातच सभा बोलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्थायी समितीच्या पाच सदस्यांनी विशेष महासभा बोलवण्यासाठी पत्र तयार केले आहे. अर्थात, त्यावर निर्णय घेण्यात झालेला नाही. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी नगरसेवक निधीतील कामे रद्द केल्याने नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यानंतर अडीचशे कोटी रुपयांचे रस्ते आयुक्तांनीगुंडाळले. त्यातच आयुक्तांनी ई कनेक्ट यंत्रणा सक्षम केल्याने नगरसेवकांना कामेच राहिली नाहीत, असे आरोप होत असतानाच काही नगरसेवकांना भेट नाकारणे किंवा ताटकळत ठेवल्याचे आरोप होऊ लागले. याच दरम्यान, कॉँग्र्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवक डॉ. हेमलता पाटील यांनी आपल्या प्रभागातील कामे रद्द करण्यासंदर्भात आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर नगरसेवकांचे अधिकार या विषयावर महासभेत लक्ष्यवेधी दिली होती. गुरुवारी (दि.१९) झालेल्या महासभेत या विषयावर चर्चा होऊ शकली नसलीतरी डॉ. पाटील यांच्या लक्षवेधीचे निमित्त करून भाजपातीलच काही ज्येष्ठ नगरसेवकांनी पुढाकार घेतला आणि स्थायी समितीतील चार सदस्यांच्या सहीने पत्र तयार केले आहे. व विशेष महासभेची मागणी केली आहे. त्यावर दिनकर पाटील, उद्धव निमसे, संतोष साळवे, पगारे यांचा समावेश आहे. करवाढी रद्दसह अन्य महासभेनेन नामंजूर केलेले ठराव आयुक्तांनी शासनाकडे पाठविल्यास त्यावेळी ही विशेष महासभा बोलविण्याची खेळी खेळली जात आहे.मुंढे यांच्या भूमिकेकडे लक्षकरवाढीचे निमित्त करून गुरुवारी झालेल्या महासभेत नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर टीकेची संधी शोधली होती. मात्र त्यावर त्याचे म्हणणे काय आहे, हे ऐकले तर नाहीच, शिवाय त्यांची बाजू मांडण्याची परवानगीदेखील नाकारण्यात आली. त्यामुळे मुंढे आता या ठरावासह केवळ त्यांनी केलेल्या ठरावाविषयी काय भूमिका घेतात व आपली बाजू कशी मांडतात याकडे महापालिका वर्तुळाचे लागून आहे.
प्रशासनाच्या विरोधात आणखी एक महासभा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 1:01 AM