नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांडनगरीमध्ये तरुणाची जुन्या वादातून हत्या करण्यात आल्याचे बोलले रितेश पाइकराव (१९) असे तरुणाचे नाव आहे. मात्र हत्या कोणी केली हे अद्याप स्पष्ट नाही.
घटनेची माहिती कळताच इंदिरानगरचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, हत्येमागील कारण पोलीस तपासानंतर स्पष्ट होऊ शकेल. 8जानेवारी ते आतापर्यंतचा हा सातवा खून आहे. इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील सव्वा महिन्यात हा दुसरा खून आहे. नव्या वर्षाच्या आठव्या दिवशी खुनाची पहिली घटना इंदिरानगर मध्ये घडली. त्यानंतर खून सत्र सुरू झाले. याप्रकरणी इंदिरा नगर पोलीस व गुन्हे शाखेचे पथकही संशयितांचा शोध घेत आहेत.