नाशिक : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशानुसार रेल्वेतर्फे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांसाठी सोमवार, दिनांक २० रोजीपासून दररोज आणखी एक रॅक उपलब्ध करून दिला जाणार आहे. सध्या दररोज चार रॅक दिल्या जात असून, आणखी रॅक वाढविण्याची मागणी होती. यंदा कांद्याचे भरघोस पीक आले असून, त्याची वाहतूक करण्यासाठी अधिक रेल्वे रॅक मिळण्याची मागणी कांदा करण्यात आली होती. या मागणीला रेल्वेमंत्र्यांनी प्रतिसाद दिला आहे. नाशिक जिल्ह्यातून कांदा पूर्व, उत्तर, ईशान्य आणि पूर्वेकडील किनारी भागात पाठविला जाणार आहे.
कांदा उत्पादकांसाठी आजपासून आणखी एक रॅक
By admin | Published: February 20, 2017 12:54 AM