नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आघाडी घेणाऱ्या जिल्हा निवडणूक शाखेने काटेकोर नियोजन केले असून, निवडणुकीसाठी जिल्ह्यासाठी आणखी तीन हजार मतदान यंत्रे दाखल झाली आहेत. यापूर्वी धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उपयोगात आणलेली ३,७५५ यंत्रे नाशिकसाठी प्राप्त झाली आहेत.पुढील महिन्यात कधीही निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असल्याने जिल्हा निवडणूक शाखा कामाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुभवानंतर लागलीच विधानसभेसाठी कंबर कसलेल्या निवडणूक शाखेने सर्व बारकाव्यांचा अभ्यास करून संपूर्ण जिल्ह्णात पारदर्शक आणि अचूक मतदारयाद्यांसाठी मोहिमा राबविल्या आहेत. याचा सकारात्मक परिणाम झाल्याने प्रारूप यादीही महिनाअखेर जाहीर होणार आहे.लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघासाठी उपयोगात आणलेली ३ हजार ७५५ मतदान यंत्रे नाशिकसाठी प्राप्त झाली आहेत.
आणखी तीन हजार ईव्हीएम दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 1:10 AM