नाशिक- शासनाच्या माझे कुटूंब माझी सुरक्षा योजनेअंतर्गत कामाची जबाबदारी देण्यात आली मात्र, पुरेशी सुरक्षा साधने देण्यात आलेली नाहीत, त्यामुळे सर्र्वेक्षण करतानाच जर सेविकांना कोरोना झाला तर त्याची जबाबदारी कोणघेणार असा प्रश्न करीत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मंगळवारी (दि.२९) जबाब दो आंदोलन करण्यात आले.मंगळवारी (दि.२९) महासभा असल्याने भारतीय हितरक्षक सभेच्या नेतृत्वाखाली राजीव गांधी भवनासमोर ठिय्या धरून निदर्शने करण्यात आली. माझे कुटूंब माझी सुरक्षा योजने अंतर्गत नाशिक महापालिकेच्या वतीने अंगणवाडीसेविकांना कामावर जुंपण्यात आले असले तरी त्यांना पीपीई किट सारखी सुरक्षा साधने देण्यात आलेली नाही की, नागरीकांच्या आरोग्य तपासणीसंदर्भात साधे प्रशिक्षण देखील देण्यात आलेले नाही. त्यामुळे या कर्मचा-यांना प्रशिक्षण द्यावे तसेच मोहिमेसाठी शासनाच्या वतीने या सेविकांना अत्यल्प म्हणजे दीडशे रूपये देण्यात येणार आहेत. त्यातमहापालिकेने भर घालून किमान दीडशे रूपये वाढवून द्यावेत, ज्या सेविकांना या आधी कोरोना झाला आहे त्यांना किमान अकरा हजार रूपयांची आर्थिक मदत करावी, ज्या कर्मचा-यांचे वय पन्नास पेक्षा आधिक आहे, आणि ज्याव्याधीग्रस्त आहेत त्यांना मोहिमेतून वगळावे, ज्यांच्याकडे अॅँड्राईड मोबाईल नाही किंवा अॅपमध्ये माहिती भरता येत नाही, त्यांना अन्य जबाबदारी द्यावी यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. संघटनेचे प्रमुख किरण मोहिते यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देण्यात आले.