महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत गणेश गीते यांनी बिनविरोध बाजी मारल्यानंतर गीते तसेच महापौर सतीश कुलकर्णी, सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते, लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार देवयानी फरांदे सीमा हिरे,राहुल ढिकले यांनी फडणवीस यांची भेट घेतली त्यावेळी ते बेालत होते. मुंबई येथे भाजप प्रदेश कार्यालयात या भेटीप्रसंगी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी पालकमंत्री गिरीश महाजन तसेच नाशिकचे प्रभारी जयकुमार रावल उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी गिरीश महाजन यांनी निवडणुकीत आखलेल्या डावपेचांविषयी चर्चा झाली. महापौर निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी केलेली खेळी यशस्वी ठरली. तीच यंदादेखील उपयुक्त ठरली, असे सांगण्यात आले. महापौर सतीश कुलकर्णी, सभागृह नेते सतीश कुलकर्णी तसेच जगदीश पाटील यांनीही यावेळी माहिती दिली. यावेळी माजी महापौर रंजना भानसी, हिमगौरी आडके, योगेश हिरे, मुकेश शहाणे, प्रतिभा पवार, शहर उपाध्यक्ष नीलेश बोरा तसेच अन्य पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
===Photopath===
090321\09nsk_91_09032021_13.jpg
===Caption===
मनपाच्या स्थायी समितीत यश मिळवल्यांनंतर सभापती गणेश गिते, महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह नाशिकमधील आमदारांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी समितीचे अन्य सदस्यही उपस्थित होते.