शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

अतिक्रमण विरोधी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:27 AM

मनपा अतिक्रमण विरोधी पथकाकडून गेल्या तीन दिवसांपासून जेलरोड परिसरात रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या अनधिकृत पत्र्यांच्या दुकानाचे अतिक्रमण हटविण्यात आले. मनपाने अतिक्रमण विरोधात जोरदार मोहीम सुरू केल्याने अतिक्रमितधारकांचे धाबे दणाणले आहे.

नाशिकरोड : मनपा अतिक्रमण विरोधी पथकाकडून गेल्या तीन दिवसांपासून जेलरोड परिसरात रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या अनधिकृत पत्र्यांच्या दुकानाचे अतिक्रमण हटविण्यात आले. मनपाने अतिक्रमण विरोधात जोरदार मोहीम सुरू केल्याने अतिक्रमितधारकांचे धाबे दणाणले आहे.  मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवारी जेलरोड, शिवाजीनगर येथील आदर्शनगरमध्ये मनपाच्या उद्यानाच्या आरक्षित जागेत २० बाय १२ आकाराचे दोन खोल्यांचे पक्क्या घराचे बांधकाम जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर जेलरोड देवमाता सदन येथील पदपथवरील गॉगल विक्रेत्याचे दुकान जप्त करण्यात आले. त्यानंतर मनपा विभागीय कार्यालया शेजारील दुर्गा उद्यान भाजीबाजार पदपथ येथे अनधिकृतपणे लावलेल्या फळ विक्रेत्यांना दुकाने काढून घेण्याचे सूचना करण्यात आली.  मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी जेसीबीच्या साह्याने जेलरोड शिवाजी पुतळ्याजवळील एमराल्ड पब्लिक हायस्कूलने इमारतीच्या सामासिक अंतरामध्ये उभारलेले पत्र्याचे शेड जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर जेलरोड दसक येथे बिलवेजा सोसायटीतील अनधिकृतपणे बांधलेले दोन पक्की बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर इंदिरा गांधी पुतळ्यापासून आगरटाकळी व उपनगरला जाणारा जुना सायखेडा रोडच्या लगत असलेली गॅरेज, फॅब्रिकेशन, पानपट्टी, रसवंती, कुलर दुरुस्ती, दुचाकी गॅरेज आदि छोटी-मोठी ५२ पत्र्यांची दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. अतिक्रमितधारकांना मनपाकडून अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटिसा देण्यात आल्यानंतर काही दुकानदारांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले होते, तर काही अतिक्रमितधारकांनी टपरीचे पत्रे काढून लोखंडी सांगाडा तसाच ठेवला होता. मात्र मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारच्या मोहिमेत जेसीबीच्या साह्याने लोखंडी सांगाडा जमीनदोस्त केला. मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, अतिक्रमण विभागाचे कैलास भागवत, एम. डी. पगारे, नगररचना विभागाचे अभियंता संजय गावित यांनी एक जेसीबी, दोन ट्रक, गॅस कटर व ३६ कर्मचाऱ्यांच्या मदतीने अतिक्रमण मोहीम राबविली. मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने दोन दिवसांपूर्वी शिखरेवाडी करी लिव्हज् हॉटेलशेजारील आठ पत्र्यांचे गाळे जमीनदोस्त केले आहे.अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणलेमनपा अतिक्रमण विरोधी पथकाकडून पक्के, पत्र्याचे कच्चे व रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांविरूद्ध जोरदार मोहीम हाती घेण्यात आल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे. तसेच दुकानाच्या बाहेर रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात दुकानातील सामान, इतर वस्तू ठेवणाºयांविरूद्धदेखील मनपाकडून कारवाई करून दंडवसूल केला जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका