शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

करवाढीविरोधी सर्वपक्षीय लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 1:30 AM

महापालिकेने मिळकत करात केलेली जबर दरवाढ ही नाशिककरांवर अन्याय करणारी असल्याने त्याविरोधात लढा उभारण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची एकत्रित मोट बांधण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, सर्वपक्षीयांच्या वतीने महापालिकेवर मोर्चा आणण्याबरोबरच कायदेशीरदृष्ट्याही लढाईची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख व मनपातील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

नाशिक : महापालिकेने मिळकत करात केलेली जबर दरवाढ ही नाशिककरांवर अन्याय करणारी असल्याने त्याविरोधात लढा उभारण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची एकत्रित मोट बांधण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, सर्वपक्षीयांच्या वतीने महापालिकेवर मोर्चा आणण्याबरोबरच कायदेशीरदृष्ट्याही लढाईची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख व मनपातील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महापालिकेने केलेल्या करवाढीविरोधात राजकीय पक्षांकडून आंदोलने सुरू झाली आहेत. परंतु याप्रश्नी गटागटाने लढाई लढण्याऐवजी सर्व पक्षांनी एकत्र येऊन त्याविरोधात उभे राहण्याची गरज असल्याचे अजय बोरस्ते यांनी सांगितले. त्यानुसार, सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांशी आपण चर्चा करणार असून, आंदोलनाची रूपरेषा निश्चित केली जाणार आहे. महासभेत करवाढीचा प्रस्ताव सादर झाला त्यावेळी सत्ताधारी भाजपातूनही बोटावर मोजण्याइतक्याच लोकांनी या करवाढीचे समर्थन केलेले आहे. त्यामुळे या करवाढीला भाजपातील अनेक नगरसेवकांचा विरोध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ दबावापोटी त्यांना आपला विरोध प्रकट करता आला नसावा. त्यामुळे या सर्वपक्षीय लढ्यात सत्ताधारी भाजपातील सदस्यांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन बोरस्ते यांनी केले. दरम्यान, स्थायी समितीने करवाढीचा प्रस्ताव महासभेवर धोरणात्मक निर्णयासाठी पाठविला असताना आयुक्तांकडून त्यात परस्पर सुधारणा करून तो महासभेवर आणण्यात आला आहे. त्याबाबतही कायदेशीर बाबी तपासून पाहिल्या जात असून, प्रसंगी कायदेशीर लढाई करण्याची तयारी असल्याचे बोरस्ते यांनी म्हटले आहे.शहराध्यक्षांशीही चर्चाकरवाढीविरोधी होणाºया आंदोलनाबाबत भाजपा शहराध्यक्षांशीही चर्चा करून त्यांना आवाहन केले जाणार आहे. तत्पूर्वी, महापौरांनी सर्व पक्षांच्या गटनेत्यांना बोलावून या करवाढीबाबत पुनर्विचार करावा, अशी विनंती केली जाणार आहे. या करवाढीची वस्तुस्थिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जागृती केली जाणार असल्याचेही अजय बोरस्ते यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाShiv Senaशिवसेना