नाशिक : जिल्हा रुग्णालय व आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त तंबाखूविरोधी रॅली काढून तंबाखूंच्या दुष्परिणांविषयी जनजागृती केली.जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयाच्या आवारात जनजागृती रॅली तसेच मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचा उद््घाटन करण्यात आले. चाणक्य कला मंचतर्फे जनजागृती पर पथनाट्य सादर करण्यात आले. प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी आरोेग्य उपसंचालक डॉं. रत्ना रावखंडे, मानवता क्युरीचे हॉस्पिटलचे डॉ. राज नगरकर आदी उपस्थित होते़यावेळी डॉ. राज नगरकर यांनी कॅन्सर व त्यावरील उपचाराबाबत मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, जिल्हा सल्लागार डॉ. शिल्पा बांगर, डॉ. किरण मंगरुळे आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी घेतली शपथसर्व वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग कर्मचारी व विद्यार्थ्यांनी तंबाखूविरोधी शपथ घेतली, तर जनजागृती रॅलीत सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. साई केअर नर्सिंग कॉंलेज, नासिक मेडिको नर्सिंग कॉलेज स्वामी नारायण नर्सिंग कॉंलेज, गोखले एज्युकेशन सोसायटी, आयटीआय, प्रवरा मेडिकल ट्रस्ट, डॉट्स संस्था, मॅग्मो वेलफेअर संस्था, एस.एम.बी.टी. ट्रस्ट धामणगाव, घोटी आदी शैक्षणिक संस्थांनीही सहभाग नोंदवला.
‘तंबाखू’विरोधी जागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:38 AM