नाशिक : कोेरोनाबाधितांची संख्या शहरात वाढत आहे, तथापि, नियंत्रणासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीतून सामूहिक संसर्ग सुरू होऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व किराणा दुकानदार तसेच दूध-भाजीपाला विक्रेत्यांची अॅँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे.फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून ही चाचणी केली केली जाणार आहे. महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी यासंदर्भात विभागीय अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. नाशिक शहरात कोरोनाचे संसर्ग अधिक वाढू नये यासाठी मिशन झिरो नाशिक ही योजना राबविली जात आहे. मात्र, त्यानंतरदेखील रुग्ण संख्या वाढत आहे. गेल्या दहा दिवसांतच तब्बल ५ हजार २२३ नवे रुग्ण आढळले आहेत तर पाच महिन्यात ४७२ जणांचा कोरोनामुळे बळी घेतल्याने चिंतेचे वातावरण आहे. कोरोना बळींची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध व्याधींनीग्रस्त कोमॉर्बिड रुग्णांना वैद्यकीय उपचाराची सुविधा दिली जात आहे. मात्र, आता वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोनाच्या समूह संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. ती टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील किराणा दुकानदार, दूध व भाजीपाला विक्रेत्यांची अॅँटिजेनचाचणी करण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.होमिओपॅथिक गोळ्याचे वाटपया चाचण्या घेण्यासाठी मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅनचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे त्या त्या भागात जाऊन अशाप्रकारची चाचणी तपासली जाणार आहे. दरम्यान, महापालिकेने विभागीय स्तरावरून ३ लाख ३२ हजार होमिओपॅथीकच्या आर्सेनिक अल्बम गोळ्यांच्या बाटल्यांचे वाटप करण्यात येणार आहे. सहाही विभागीय कार्यालयांमार्फत आतापर्यंत दोन लाख ३३ लाख बाटल्यांचे वाटप करण्यात येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आणि विशेषत: प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे औषध उपयुक्त ठरत आहे. असा दावा अनेक डॉक्टरांनी केला असून, त्यासाठी या औषधांचा वापर केला गेला आहे.
दुकानदारांसह भाजीविक्रेत्यांची अॅँटिजेन चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 1:28 AM
कोेरोनाबाधितांची संख्या शहरात वाढत आहे, तथापि, नियंत्रणासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीतून सामूहिक संसर्ग सुरू होऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व किराणा दुकानदार तसेच दूध-भाजीपाला विक्रेत्यांची अॅँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देपूर्वदक्षता। समूह संसर्ग टाळण्यासाठी मनपाकडून कार्यवाही; फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून होणार चाचण्या