पंचवटी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजासमोर सुरू असलेल्या सुशोभिकरण कामादरम्यान रस्ता खोदकाम करताना आढळून आलेल्या पायऱ्यांचे गूढ उकलले असून पूर्वीच्या काळी मंदिरासमोर बांधलेला अंदाजे १५ बाय १५ आकाराचा चबुतरा असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या गुरुवारी मंदिरासमोर खोदकाम करताना साडेचार फुट खोलीच्या अंतरावर दगडी पायºया आढळून आलेल्या होत्या. दगडी पायºया आढळून आल्याने विविध तर्कवितर्क वर्तविले जात होते. गुरुवारी पायºया आढळून आल्याने नागरिकांनी पायºया बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर खोदकाम थांबविण्यात आले होते.दरम्यान, शुक्रवार व शनिवारी पुन्हा खोदकाम केल्यानंतर पूर्वीच्या मूळ बांधकाम केलेल्या पायºया आढळून आल्या, तर मंदिरासमोर चार पायºया तसेच साधारणपणे १५ बाय १५ आकाराचा चबुतरा असल्याचे निष्पन्न झाले आहे, तर पूर्व दरवाजाला लागून अडीच फुटाचे दोन्ही बाजूला दगडी ओटे आढळून आले होते.तसेच खोदकाम करतेवेळी पायऱ्यांनजीक जुनी लोखंडी नालदेखील आढळून आलेली होती. काळाराम मंदिराच्या दक्षिण दरवाजाला लागून जसा चबुतरा आहे तसाच चबुतरा पूर्व दरवाजासमोर खोदकाम करताना आढळल्याने दक्षिण व पूर्व दरवाजासमोर मंदिराचे बांधकाम करताना चबुतरे बांधले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राममंदिरासमोर आढळला पुरातन चबुतरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 1:01 AM