नाशिक : शहराच्या विविध भागांत आणखी दोन नवीन कोरोनाबाधित रुग्ण गुरुवारी (दि. १५) आढळून आल्याने शहरवासीयांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी आढळलेला एक रुग्ण हा टॅक्सीचालक असल्याने त्याचा अनेकांशी संपर्क आला असल्याची भीती महापालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे. तर दोन दिवसांपूर्वी प्रसूत झालेल्या महिलेचादेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाल आहे. त्यामुळे त्या बाळाचीही चाचणी केली जाणार आहे.तूर्तास संबंधित प्रसूतीगृहातील डॉक्टरांसह सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. सदर रुग्णांचे वास्तव्य असलेल्या सिडकोतील पाटीलनगर आणि आनंदवलीतील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरातील मूळ बाधितांचे प्रमाण कमी झाले असताना गुरुवारी आढळलेल्या या दोन रुग्णांमुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ४२ झाली आहे. नाशिक शहरातील रुग्णसंख्या मर्यादित असली तरी बाहेरून येणाºया रुग्ण आणि त्यांच्या नातलगांमुळे संख्या वाढत असल्याचा महपालिकेचा दावा आहे. त्यातच २० एप्रिल रोजी म्हणजे तिसºया लॉकडाउनमध्ये अनेक अनेक निर्बंध शिथिल झाल्यागत शहरातील वर्दळ नेहमीप्रमाणे वाढली आहे. बाहेर गावी खासगी वाहनाने जाणाºया येणाऱ्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यामुळे आता संख्यादेखील वाढत आहे. मंगळवारी (दि.१२) महपाालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन या कोरोनासाठी राखीव रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महापालिकेतील कर्मचारी धास्तावले होते. त्यानंतर एक दिवस मूळ शहरातील एकही रुग्ण न आढळल्याने मिळालेला दिलासा अल्पकाळ टिकला. गुरुवारी दोन रुग्णांची त्यात भर पडली.सिडकोतील पाटीलनगरमधील एका टॅक्सीचालकाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित चालक हा ११ मेस जिल्हा शासकीय रुग्णालयात सर्दी, ताप आणि खोकल्याच्या त्रासामुळे उपचार घेण्यासाठी दाखल झाला होता. हा चालक घोटी-इगतपुरीपर्यंत दरम्यान टॅक्सी चालविण्याचा व्यवसाय आहे. त्याला मुंबईतील कोणाच्या संपर्कामुळे कोरोनाची बाधा झाली असण्याची शक्यता आहे, तर गंगापूूररोडवरील खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल महिलेचा प्रसूतीपूर्वी घसा स्त्रावाचा नमुना घेण्यात आला होता. या महिलेच्या दोन दिवसांच्या बाळाचाही आता चाचणी केली जाणार आहे.या घटनेनंतर सिडकोतील पाटीलनगर तसेच आनंदवली येथील भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून सील करण्यात आला आहे. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.शहरापेक्षा बाहेरील रुग्ण अधिकएप्रिल महिन्यात नाशिक शहरात १० रुग्ण होते. मात्र मे महिन्याच्या१२ दिवसांत ही संख्या आता चौपट झाली आहे. गुरुवारी दोन रुग्ण आढळल्याने ही संख्या ४२ झाली आहे. त्यामुळे महापालिकेची चिंतादेखील वाढली आहे. अर्थात, यात मूळ शहरातील रहिवासींचीसंख्या कमी असून, बाहेरगावातील या शहरात उपचारासाठी आलेलेकिंवा मालेगाव येथे कर्तव्यास नियुक्त असलेल्यांची संख्या अधिक आहे. दोन रुग्ण तर राज्याबाहेरील आहेत.
दोन रुग्ण वाढल्याने चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 11:48 PM
शहराच्या विविध भागांत आणखी दोन नवीन कोरोनाबाधित रुग्ण गुरुवारी (दि. १५) आढळून आल्याने शहरवासीयांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी आढळलेला एक रुग्ण हा टॅक्सीचालक असल्याने त्याचा अनेकांशी संपर्क आला असल्याची भीती महापालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे. तर दोन दिवसांपूर्वी प्रसूत झालेल्या महिलेचादेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाल आहे. त्यामुळे त्या बाळाचीही चाचणी केली जाणार आहे.
ठळक मुद्देसंख्येत वाढ : सिडको-आनंदवलीचा परिसर पुन्हा सील