येवला : येवला शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. वाढती रूग्णसंख्या प्रशासनासह नागरिकांसाठी ची डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.येवला शहरासह तालुक्यातील 25 अहवाल एकाच दिवसात पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील भाटगाव, देशमाने, नागडे, सोमठाण देश, मातुलठाण आदी गावांमध्ये कोरोनाचा नव्याने शिरकाव झाला आहे. तालुक्यात कोरोना बाधितांनी शंभरी ओलांडली असून सद्यस्थितीला 166 रुग्ण बाधित आहेत. यापैकी आजपर्यंत 102 बाधित कोरोनामुक्त झाले असून तालुक्यात कोरोनाबळींची संख्या 11 झाली आहे. प्रशासनासह आरोग्यविभाग कोरोना संपर्क साखळी तोडण्यासाठी उपाययोजना करत आहेत. रूग्णसंख्या वाढती असली तरी तालुक्याचा रिकव्हरी रेट 75 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी सांगितले. दिवसेंदिवस येवला शहरासह तालुक्यात कोरोनाबाधितांच्या रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने शहरवासीयांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. शहरात नगरपालिका प्रशासनासह, पोलिस व आरोग्य यंत्रणेने आपापली जबाबदारी सक्षमपणे पार पडणे गरजेचे असल्याचे मत शहरवासीयांकडून व्यक्त केले जात आहे. याबरोबरच शहरात आरोग्यविभागाने सर्वे करावा, पालिकेने कंटेन्मेंटझोन तयार करून नियमांचे कठोर पालन करावे, महसूल यंरेअणेने यावर नियंत्रण ठेवावे, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.
कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येने चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 3:19 PM
येवला : येवला शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. वाढती रूग्णसंख्या प्रशासनासह नागरिकांसाठी ...
ठळक मुद्देयेवला : येवला शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. वाढती रूग्णसंख्या प्रशासनासह नागरिकांसाठी ची डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.