शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

विकासासोबतच राममंदीरही भाजपाच्या अजेंडयावर : रावसाहेब दानवे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 9:38 PM

भारतीय जनता पार्टी येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये विजयासाठी तयारी करीत असून, विकासासोबतच राममंदिराचा मुद्दाही पक्षाच्या अजेंड्यावर असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. रावसाहेब दानवे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील २८८ विधानसभा मतदासंघ व ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केला असून, त्यांनी रविवारी (दि.११) नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदासंघांमधील निवडणूकपूर्व तयारीचा आढावा घेतला.

ठळक मुद्देभाजपाकडून नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघाचा आढावा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी घेतली आढावा बैठक

नाशिक : भारतीय जनता पार्टी येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये विजयासाठी तयारी करीत असून, विकासासोबतच राममंदिराचा मुद्दाही पक्षाच्या अजेंड्यावर असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.रावसाहेब दानवे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील २८८ विधानसभा मतदासंघ व ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केला असून, त्यांनी रविवारी (दि.११) नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदासंघांमधील निवडणूकपूर्व तयारीचा आढावा घेतला. त्यापूर्वी भाजपाच्या वसंतस्मृती या मध्यवर्ती कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेशसंघटनमंत्री विजय पुराणिक यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, वसंत गिते, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे आदी उपस्थित होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना दानवे यांनी विकासाच्या मुद्द्यावर भाजपा निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. गेल्या पंधरवड्यातच पेट्रोलचे दर ९१ रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले असतानाही दानवे यांनी कुठे आहे महागाई? असा प्रतिप्रश्न करीत महागाईच्या प्रश्नांना मात्र बगल दिली. त्यासोबतच धुळे येथील दानवे यांच्या सभेत अनिल गोटे यांच्या गटाने गोंधळ घातल्याच्या मुद्द्यावरही ही संघटनात्मक बाब असल्याचे सांगत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

नाशकात मतभेद नाही धुळे येथील आढावा बैठकीत भाजपामधील स्थानिक नेत्यांमध्ये असलेली खदखद प्रत्यक्ष प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमोर बाहेर पडली. त्यामुळे नाशिकमध्येही भाजपाच्या तिन्ही आमदारांचे वेगवेगळे गट असल्याची चर्चा सुरू झाली असून, अन्य पक्षातून भाजपात आलेल्या नेत्यांचेही स्वतंत्र गट असल्याचे बोलले जात आहे. परंतु, नाशिकमध्ये असे कोणतेही गटतट नसल्याचे सांगत रावसाहेब दानवे यांनी स्थानिक नेत्यांच्या मतभेदांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न के ला. 

मत वाढण्यासाठी कोणालाही प्रवेश धुळे येथील सभेत एका संशयित गुंडाने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावर स्पष्टीकरण देताना संबंधित व्यक्तीला पक्षात प्रवेश दिला असला तरी कोणतेही पद अथवा जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे असा प्रवेश म्हणजे केवळ पक्षाचे एक मत वाढविण्याचा प्रकार असून, अशाप्रकारे मत वाढविण्यासाठी कोणालाही प्रवेश द्यायला हरकत नसल्याची भुमिका त्यांनी घेतली.

टॅग्स :BJPभाजपाNashikनाशिकRaosaheb Danweरावसाहेब दानवेMLAआमदार