लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शिक्षण संस्थेच्या (बार्टी)च्या वतीने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनुसुचित जातीच्या प्रवर्गातील ५९ जातींच्या सर्वेक्षणाचे काम जवळपास पुर्ण होत आले असल्याची माहिती समतादूत म्हणुन काम करणाऱ्या सुजाता वाघमारे यांनी दिली.त्र्यंबकेश्वर तालुक्यात एकुण १२५ गावांत व वाड्या, पाडे १९५ आहेत. तथापि तालुका शासन दरबारी १०० टक्के गणला जातो. म्हणुन हा अनु.जमाती मतदार संघ आहे. मात्र तालुक्यात अनुसुचित जातीचे ६६ गावे असुन याच जातीचे ५९ प्रवर्ग आहेत. मात्र समाजातील दुर्लक्षित, वंचित घटक समाजाचा हिस्सा बनुन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे व विकासाच्या संधी उपलब्ध करु न देणे हा सर्वेक्षणाचा मुख्य हेतु आहे.अनु. जातींना मिळणाºया सवलती नोकरीच्या संधी विविध विकासाच्या संधी तसेच त्यांना अनु. जातीच्या मुख्य प्रवाहात आणणे व त्यांना सर्वांगिण विकासाच्या संधी उपलब्ध करु न देणे ध्येय आहे. यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या माध्यमातून गाव निहाय सर्वेक्षण समतादुतांमार्फत सुरु केले आहे. आतापर्यंत ५२ गावांचे सर्वेक्षणाचे काम पुर्ण झाले आहे. उर्वरित काम पुर्णत्वाकडे असल्याचे समजते.
अनु. जातींच्या विविध प्रवर्गाचे त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वेक्षण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 4:24 PM
त्र्यंबकेश्वर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शिक्षण संस्थेच्या (बार्टी)च्या वतीने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनुसुचित जातीच्या प्रवर्गातील ५९ जातींच्या सर्वेक्षणाचे काम जवळपास पुर्ण होत आले असल्याची माहिती समतादूत म्हणुन काम करणाऱ्या सुजाता वाघमारे यांनी दिली.
ठळक मुद्देआतापर्यंत ५२ गावांचे सर्वेक्षणाचे काम पुर्ण झाले