नाशिक : येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे संभाजी भिडे यांनी सभेत ‘आंबे खाल्यानंतर पुत्रप्राप्ती होते’या केलेल्या अशास्त्रीय विधानाविरोधात त्यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. हे विधान गर्भलिंग चाचणी कायद्याच्या विरोधातील असल्याचे सांगत हे विधान सनातनी वृत्तीचे निर्देशक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या वक्तव्याची शहानिशा करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महेंद्र दातरंगे, सुधीर धुमाळ, समीर शिंदे आदी उपस्थित होते.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:25 AM