नाशिक : अभियांत्रिकी महाविद्यालयाचा २०१४-१५ सालचा निकाल १३ जानेवारी रोजी लागल्यानंतरही अद्याप विद्यार्थ्यांना त्याचे निकालपत्रक मिळालेले नाही. ते त्वरित मिळावे, अशी मागणी मराठा महासंघ विद्यार्थी आघाडीच्या वतीने के. के. वाघ महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १३ जानेवारी रोजी लागलेल्या निकालाची प्रत अद्यापही विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नाही. ती विद्यापीठाकडून इंटरनेटवरही टाकण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कामकाजासाठी निकालाची प्रत मिळणे आवश्यक असताना, ती न मिळाल्याने त्यांचे शैक्षणिक काम रखडले आहे. विद्यार्थ्यांना ती त्वरित मिळावी यासाठी महाविद्यालयाने विद्यापीठाशी त्वरित संपर्क साधून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी फुले पुणे विद्यापीठाच्या समन्वय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हा सरचिटणीस विश्वास वाघ, उपजिल्हाध्यक्ष ऋषिकेश निसाळ, अक्षय ठोके, प्रशांत कर्डिले, जिल्हा संघटक मंगेश पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
अभियांत्रिकीच्या निकालाबाबत निर्णय घेण्याचे आवाहन
By admin | Published: February 05, 2015 12:19 AM