नांदगाव:रस्ते बांधकामासाठी पाझर तलाव, गाव-तळयांमधून राष्ट्रीय महामार्ग बांधकामासाठी लागणारे गौण खनिजे काढून वापरल्यास शासनाचा मोठा आर्थिक भार कमी होणार असून बंधारे तलाव, नदी-नाले यांची खोली वाढून जलसंवर्धनाची कामेही होणार आहेत. जलपुर्नभरण झाल्याने दुष्काळी परिस्थितीवर मात करता येणे शक्य होणार आहे. म्हणून संबधित बांधकाम यंत्रणा ,कंत्राटदार, महसूल अधिकारी, गटविकास अधिकारी यांना संदर्भीय आदेश देण्यात यावे अशी विनंती जि.प.सदस्या अश्विनी आहेर यांनी जिल्हाधिकारी नासिक यांना केली.तालुक्यातून जाणाº्या राष्ट्रीय मार्गाचे काँक्र ीटीकरण डांबरीकरण वगैरे कामांना सुरवात होत असून त्यासाठी लागणारे गौण खिनजे उपरोल्लिखित मागणीनुसार वापरावी तसे झाले तर ते शेतकरी हिताचे ठरेल. तालुक्यात चांदवड-मनमाड-नांदगाव-जळगाव या महामार्ग क्र मांक ७५३चेकाम सुरू होत आहे. या रस्ता बांधकामासाठी मुरूम, माती, इत्यादी गौण खनिजांची गरज भासणार आहे .जळगाव बु,पिंपरखेड, परधाडी शिवार,न्यायडोंगरी,इ. महसुली गावातून हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे. अशी माहिती अिश्वनी आहेर यांनी दिली. जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना तालुक्याचे माजी आमदार अनिल आहेर, उदय पवार, हरेश्वर सुर्वे, योगेश वाघ,नवनाथ बोरसे इत्यादी उपस्थित होते.
नांदगाव तालुक्यातील नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 4:33 PM