नाशिक : कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षण गरजेचे असल्याने ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेने एक अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी ‘डोनेट अ डिव्हाइस’ या नावाने नागरिकांकडे विनावापर पडून असलेले जुने अॅण्ड्रॉइड मोबाइल दान करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांसाठी तंत्रसेतू नाशिक हेल्पलाइन व विद्यावाहिनी रेडिओ या उपक्रमांचाही बुधवारी शुभारंभ करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात फिजिकल डिस्टन्सचे पालन करून अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आरोग्य व शिक्षण सभापती सुरेखा दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महिला व बाल कल्याण सभापती अश्विनी आहेर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनीही आॅनलाइनद्वारे सहभाग नोंदविला.यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष क्षीरसागर यांनी, शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनादेखील कोरोनाच्या या संकटकाळात दर्जेदार शिक्षण मिळायला हवे यासाठी समाजातील सर्व घटकांनी ‘डोनेट अ डिव्हाइस’ उपक्रमांतर्गत आपल्याकडील जुने मोबाइल, लॅपटॉप, संगणक, स्मार्ट टीव्ही दान करण्याचे आवाहन केले. ज्या ठिकाणी मोबाइल रेंज उपलब्ध नाही अशा ठिकाणी शिक्षकांमार्फत गटागटाने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी, ग्रामीण भागामध्ये स्मार्टफोन व इतर सामग्रीअभावी विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य होत नाही. ते त्यांना शक्य व्हावे यासाठी विविध स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी आपल्याकडील विनावापर पडून असलेले जुने मोबाइल व अन्य साहित्य दान करण्याचे आवाहन केले. यावेळी शिक्षण सभापती सुरेखा दराडे यांनीही मार्गदर्शन केले. शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांनी प्रास्ताविक केले.बारा मोबाइल झाले दानया कार्यक्रमातच उपस्थित मान्यवरांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बारा मोबाइल विद्यार्थ्यांसाठी दान केले, तर अध्यक्ष, सभापती व मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी नवीन मोबाइल घेऊन देण्याचे जाहीर केले. यावेळी कन्या शाळेच्या दोन विद्यार्थिनींना आॅनलाइन शिक्षणासाठी प्रातिनिधिक स्वरूपात मोबाइल वाटप करण्यात आले.
जुना मोबाइल विद्यार्थ्यांना दान करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:42 AM
कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षण गरजेचे असल्याने ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेने एक अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी ‘डोनेट अ डिव्हाइस’ या नावाने नागरिकांकडे विनावापर पडून असलेले जुने अॅण्ड्रॉइड मोबाइल दान करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांसाठी तंत्रसेतू नाशिक हेल्पलाइन व विद्यावाहिनी रेडिओ या उपक्रमांचाही बुधवारी शुभारंभ करण्यात आला.
ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा उपक्रम : आॅनलाइन शिक्षणाचा शुभारंभ, हेल्पलाइन व रेडिओचाही शुभारंभ