नाशिक : सन २०२०-२१ मध्ये युरोपीयन युनियन आणि इतर देशांना द्राक्ष निर्यात करण्यासाठी नोंदणी बंधनकारक करण्यात आली असल्याने कीटनाशक उर्वरित अंश आणि कीड रोगांची हमी देण्यासाठी ग्रेपनेटव्दारे नियार्तक्षम दाक्ष बागांची नोंदणी करण्यात येत आहे. इच्छुकांनी आपल्या द्राक्ष बागांची नोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. नियार्तक्षम बागा नोंदणीकरीता ग्रेपनेट ही आॅनलाईन प्रणाली कारयान्वीत कण्यात आली आह. सन २०२०-२१ करीता नोंदणी, नुतनीकरणासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी संजीव पडवळ, कृषी उपसंचालक कैलास शिरसाट यांनी केले आहे. नोंदणीसाठी अंतिम मुदत २९ नोव्हेंबर २०२० पर्यंत आहे. बागायतदारांनी विहित मुदतीत नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.