लासलगाव : राज्य शासनाच्या निर्णयानुसार जुलै व आॅगस्ट २०१६ मध्ये लासलगाव बाजार समितीत विक्री केलेल्या कांद्यास अनुदान मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी तत्काळ बाजार समितीकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केले. यंदा कांदा बाजारभावातील घसरणीमुळे राज्यातील शेतकरी बांधवांना आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने माहे जुलै व आॅगस्ट, २०१६ मध्ये कांदा विक्री केलेल्या शेतक-यांना १०० रुपये प्रती क्विंटलप्रमाणे एकुण २०० क्विंटल मर्यादेपर्यंत अनुदान देण्यासाठी योजना जाहीर केलेली आहे. त्यानुसार बाजार समितीच्या लासलगांव मुख्य व निफाड उपबाजार आवारावर स्वत:च्या नांवे ७/१२ उतारा असलेल्या व उता-यावरील नावानेच कांद्याची विक्र ी केलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतक-यांनी शासन निर्णयानुसार कांदा अनुदान मिळण्यासाठी दि. ०१ जुलै, २०१६ ते ३१ आॅगस्ट, २०१६ या कालावधीत विक्र ी केलेल्या कांदा हिशोब पावत्यांच्या सुस्पष्ट झेरॉक्स प्रती, ७/१२ उतारा, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (नसल्यास इतर राष्ट्रीयकृत बँकेच्या) पास बुकातील फोटो लावलेल्या पहील्या पानाची झेरॉक्स प्रत (शाखेचे नाव, कोड क्र मांक, बचत खाते क्र मांक, तसेच संपूर्ण नाव व पत्त्याचा पुरावा इत्यादि माहिती बुधवार, दि. २१/९/२०१६ पर्यंत ज्या बाजार आवारावर कांदा विक्र ी केलेला आहे, त्या ठिकाणच्या कार्यालयात अनुदान मागणी अर्ज सादर करावे. अनुदान मागणी अर्ज बाजार समितीच्या लासलगांव मुख्य व निफाड उपकार्यालयात विनामुल्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. शेतकरी बांधवांनी अनुदान प्राप्त करून घेणेसाठी बाजार समितीकडून अनुदान मागणी अर्ज घेऊन सर्व कागदपत्रांची पूर्तता करून विहित मुदतीत सादर करावे, असे आवाहन होळकर यांनी केले आहे. (वार्ताहर)
कांदा अनुदान मागणीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
By admin | Published: September 17, 2016 12:11 AM