मालेगाव : सन २०१५-१६ प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या योजनेचा परिसरातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार व तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे यांनी केले आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर आहे. या योजनेच्या लाभासाठी अर्जासोबत सातबारा उतारा, पाणीपुरवठा साधनांची नोंद, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, लाभार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, इतर मागासवर्गीय प्रमाणपत्र, आधार कार्ड, वीजबिलाची झेरॉक्स, वितरकाचे कोटेशन, डिलिव्हरी चलन, चतु:सीमा, माती-पाणी परीक्षण अहवाल, १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा, कंपनी, वितरक यांच्या स्वाक्षऱ्या संचाचा आराखडा, सामायिक क्षेत्र असेल त्या ठिकाणी इतर खातेदारांचे संमतीपत्र जोडणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
कृषी सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
By admin | Published: November 03, 2015 9:43 PM